दीपक मोहिते,
वसईतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी तातडीने मान्य,दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु,
वसईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसईतील महत्वाचे रस्ते,उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना गती देण्यासाठी ३० सप्टें.२०२५ रोजी वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण एम.एम.आर.डी.ए.तर्फे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते.
तथापि,याविषयीची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे व काम पूर्ण करणे या दरम्यान लागणाऱ्या कालावधीत नागरिकांचा त्रास कमी व्हावा,यासाठी तातडीने हे रस्ते किमान वाहतूक योग्य करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री यांनी मान्य केले व तसे आदेश तात्काळ वसई विरार शहर महानगर पालिकेच्या आयुक्तांना दिले.
त्यानुसार या भागात तातडीने दुरुस्ती कराव्या लागणाऱ्या रस्त्यांची यादीसह आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विरार शहर महानगर पालिकेच्या आयुक्तांबरोबर मुख्यालयात नुकतीच सविस्तर चर्चा केली.
या चर्चेनंतर आयुक्तांनी तात्काळ पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शहर अभियंत्याना दिले.त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील ८ रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया महानगर पालिकेने सुरू केली असून आणखी काही रस्त्यांची निविदा प्रक्रिया पुढील २ – ३ दिवसात सुरु करण्यात येणार आहे.
वसईच्या नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यामुळे भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालून प्रशासनाला दिलेल्या आदेशांबाबत आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.तसेच मुख्यमंत्री यांच्या आदेशांची त्वरीत अंमलबजावणी सुरु केल्याबाबत आयुक्त,वसई विरार शहर महानगर पालिका यांनाही धन्यवाद दिले आहेत.

