- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, बोईसर मतदारसंघात बविआचे कार्यकर्ते कामाला लागले.. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पहिली बैठक आज देवभूमी सफाळे येथे पार पडली.श्री गणरायाच्या व संविधानाच्या प्रतिमेसमोर नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या बैठकीला आ.राजेश पाटील यांच्यासह राजीव पाटील,प्रविण राऊत,सुरेश तरे,तालुका अध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजीव पाटील व प्रविण दादा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.तसेच आपली शिटी निशाणी पळवण्याचा प्रयत्न करणा-यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिली व आपल्या अथक प्रयत्नानंतर शिटी निशाणी आपल्याला मिळाली,हा आपला विजय असल्याचे या दोघांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत जेव्हा राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तो बोईसर मतदारसंघासाठी ते नवीन…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, माझा फोकस विकासकामांवर -आ.क्षितिज ठाकूर, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ.क्षितिज ठाकूर हे कालपासून उसंत न घेता आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत.चौकाचौकात त्यांच्या लहानमोठ्या सभा घेण्यास सुरुवात होत आहेत.त्यांच्या या उपक्रमाला नालासोपारावासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर त्यांच्या प्रचाराचा भर आहे.शहरात झालेल्या जाहीर सभेत भाषण करताना ते म्हणाले,२००९,२०१४ व २०१९ या सलग तीन निवडणुकांमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले.याही निवडणुकीत तसच प्रेम मला तुमच्याकडून मिळणार आहे,याची मला खात्री आहे.वाढत्या नागरीकरणामुळे विकासकामे करताना अनेक अडथळे येत असतात,पण मी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर मात करू शकलो.आपल्या शहराची लोकसंख्या सुमारे आठ लाखाच्या घरात पोहोचली आहे.वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या…
दिपक मोहिते, निवडणूक पर्व, आ.हितेंद्र ठाकूर यांचा प्रचार दणक्यात सुरू;विरोधी पक्षाच्या उमेदवारांची बत्ती गुल…. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काल चर्चमध्ये जाऊन फादरांची भेट घेतली व सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले.त्यानंतर त्यानी आपल्या प्रचारास रीतसर सुरुवात केली.आ.ठाकूर यांची ही कृती त्यांना दिलासा देणारी ठरली आहे.त्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ख्रिस्ती समाजातून भरभरून मते मिळत असतात,यंदाही तशीच स्थिती राहणार आहे.या समाजाच्या अनेक विकासकामांबाबत आ.ठाकूर हे कायम प्रयत्नशील राहिले.या समाजाच्या अनेक तरुण उद्योजकांना विविध उद्योगात त्यांनी पुढे आणले.त्यामुळे त्यांच्या जवळच्या वर्तुळात अनेक ख्रिस्ती तरुण पाहायला मिळतात.तसेच मुस्लिम समाजातही त्यांना मानाचे स्थान आहे.सर्वधर्मसमभाव पाळत त्यांनी मुस्लिम समाजाचे अनेक जटील प्रश्न मार्गी लावले. शिक्षण,आरोग्य,वक्फ बोर्ड व…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला असून काल त्यांनी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आपल्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला.काल त्यांनी विरार पूर्व भागातील अनेक प्रभागात प्रचाराच्या मोहिमेस सुरुवात केली.यावेळी त्यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला.त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रचारात महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जागोजागी अनेक महिलांनी त्यांना ओवाळले व विजयाच्या शुभेच्छा दिला.यावेळी मतदारांशी संवाद साधताना आ.क्षितिज यांनी आपला फोकस केलेल्या विकासकामांवर ठेवला.तसेच सध्या जाणवणाऱ्या नागरी समस्यांचा आढावाही घेतला.ज्या काही समस्या प्रलंबित आहेत,त्या अल्पावधीत मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी जागोजागी…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, आपल्याला खोकेबाज सरकार भस्मसात करायचे आहे-उद्धव ठाकरे, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघात झालेली पहिली जाहीर सभा न भूतो न भविष्यती अशी झाली.या जाहीर सभेला झालेल्या गर्दीने यापूर्वीचे सारे रेकॉर्ड ब्रेक केले. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभाराची अक्षरशः पिसे काढली.ते यावेळी म्हणाले, कोण स्वतःला देवाभाऊ तर कोण स्वतःला गुलाबी भाऊ म्हणतो,पण हे तिन्ही भाऊ जेथे जाऊ तेथे खाऊ,अशा पद्धतीने वागत आहेत.ज्या माणसाला आपण सर्वस्व दिलं,मानसन्मान प्रेम व आमदारकी दिल्यानंतरही हा नराधम आता शिवसेना नावाच्या आईच्या छाताडावर वार करायला उभा आहे.पण त्याला ते शक्य होणार नाही,कारण या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटील यांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या वैचारिक गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.गेल्या तीन महिन्यापासून ते मराठा समाज,विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार व मराठा आरक्षण विरोधात असलेल्या उमेदवारांना पाडणार,असे सांगत होते.पण काल त्यांनी अचानक घुमजाव करत निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय रद्द केला.जरांगे पाटील यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निवडणूक लढण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यांनी आता रिंगणात असलेल्या इतर पक्षाच्या उमेदवारांकडून,” आपला मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे,” असे लिहून घ्यायचे ठरवले आहे.जो उमेदवार असे लिहून देईल,त्याला आपण पाडायचं नाही,असे जाहीर केले आहे.हा एकप्रकारे…
दीपक मोहिते, विक्रमगड वगळता इतर मतदारसंघातील बंडखोरी संपुष्टात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालघर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील अनेक बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले.परंतु शिंदे गटाचे बंडखोर तसेच पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी विक्रमगड मतदारसंघात मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.त्यामुळे येथील भाजपचे उमेदवार हरीश्चंद्र भोये अडचणीत आले आहेत. १२९ विक्रमगड मतदारसंघात आता ११ उमेदवार रिंगणात आहेत.त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनील भुसारा,भाजपचे हरिश्चंद्र भोये,मनसेचे सचिन शिंगडा,बविआचे हेमंत खुताडे,शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम व अन्य सहा जण असे एकूण ११ जण रिंगणात आहेत.मात्र खरी लढत भाजपचे भोये व राष्ट्रवादीचे भुसारा यांच्यात होणार आहे.…
दीपक मोहिते, ” शिट्टी,” चिन्हाचा तिढा अखेर सुटला, अखेर विरोधकांचा डाव उधळला गेला.बहुजन विकास आघाडीचे ” शिट्टी,” हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत.आज मुंबई उच्च न्यायालयाच्या आरिफ एस.डॉक्टर व सोमशेखर सुंदर्शन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला. शिट्टी हे चिन्ह संयुक्त जनता दलाला बहाल करण्यात आल्यामुळे ते बहुजन विकास आघाडीला देता येणार नाही,असे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात आले होते.त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता.या प्रकरणी बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.आघाडीच्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आरिफ एस.डॉक्टर व सोमशेखर सुंदर्शन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” सर्वत्र बंडखोरीची लागण, गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकून महायुतीच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता.त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीचा त्रास झाला नव्हता,पण यावेळी मात्र दोघांना बंडखोरांनी अक्षरशः जेरीस आणले आहे.बंडखोरांची समजूत काढताना वरिष्ठ नेत्यांची प्रचंड दमछाक होत आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात बंडखोरांनी रणशिंग फुंकल्यामुळे शरद पवार यांना इंदापुरात दाखल व्हावे लागले आहे.तर बोरिवली येथे माजी.खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करत भाजपची अवस्था बिकट केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी व शाह जोडीने गोपाळ शेट्टी…
दीपक मोहिते, वास्तव, बोईसर येथे विलास तरे व राजेश पाटील यांच्यामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा सामना.. १३१ बोईसर विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना ( उबाठा ),शिवसेना ( एकनाथ शिंदे ) बहुजन विकास आघाडी या तिघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.भाजपने या मतदारसंघात स्वतःचा शिलेदार माजी आ.विलास तरे याना एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी मिळवून दिली आहे.तर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांची साथ सोडून आपल्या मनगटावर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेणाऱ्या डॉ.विश्वास वळवी यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.हे दोन्ही उमेदवार बलाढ्य असे असून बविआचे विद्यमान आ.राजेश पाटील यांची त्यांच्याशी लढत होत आहे.या तिघांपैकी बोईसर पश्चिम भागात जो उमेदवार सर्वाधिक मते घेईल,तोच सिकंदर…
