वसंत भोईर,वाडा,
वाड्यातील कोंढले-खैरे रस्त्याची दुरवस्था,ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
तालुक्यातील कोंढले-खैरे,या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून,या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणे कठीण झाले आहे.वाहनचालक आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करत आहेत.शासनाने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.या रस्त्याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाडा तालुक्यातील कोंढले – खैरे रस्ता हा ९ कि. मी.अंतराचा असून तो प्रचंड वर्दळीचा आहे.कोंढले विभागातील १५ ते २० गावपाड्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.या रस्त्याची सध्या चाळण झाली असून, गाव- पाड्यांतील नागरिकांना या रस्त्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
कोंढले-खैरे हा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे.या रस्त्याची नव्याने दुरुस्ती होण्यासंदर्भात शासन स्तरावर अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहेत.मात्र याबाबत कुठलीच दखल आजवर घेण्यात आली नाही.
सचिन झोले,
माजी ग्रामपंचायत सदस्य, ( कोंढले )

