सुरेश काटे,तलासरी,
अणवीर गावात चार बंधाऱ्याचे भूमिपूजन,
यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून तलासरी तालुक्यांतील अणवीर गावात गेल्या चार वर्षांपासून सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे.याच कामाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून संस्थेने पाणलोट विकासाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.
यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून तलासरी तालुक्यांतील अणवीर गावात गेल्या 4 वर्षांपासून सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. याच कामाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून संस्थेने पाणलोट विकासाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो,परंतु गावा – गावांमध्ये जलसंधारण यंत्रणा पुरेशी आणि मजबूत नसल्याने पाणीसाठा होत नाही.त्यामुळे पावसाळा संपला की डिसें.महिन्यात गावात पाण्याची टंचाई निर्माण होते.त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता येत नाही,दुबार आणि तीबार पीक घेता येत नाही. परिणामी कुटुंबाची कुटुंबे रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करतात.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीतील पाण्याचा साठा वाढावा,वाढलेल्या पाण्याच्या साठ्याचा फायदा शेतकऱ्यांना दुबार व तिबार पिक घेण्यासाठी व्हावा आणि उन्हाळ्यामध्ये जनावरांना, पक्षांना पिण्यास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाणलोट विकासाचा विषय संस्थेने हाती घेतला आहे.
जलसंधारणाचे स्त्रोत वाढावेत म्हणून संस्थेने ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहभागाने मृद व जलसंधारण उपविभाग,पालघर येथे संपर्क साधला.गावात चार बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असणारा टेक्निकल सर्वे पूर्ण करून त्याची संपूर्ण माहिती संस्थेने मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी देऊन एकूण भौगोलिक परिस्थिती समजून घेतली व आवश्यक ते काम पूर्ण करून घेतले.संस्थेच्या एकूण कामाची दखल पालघर जिल्हा नियोजन विभागातून या कामाला त्वरित मंजुरी देण्यात आली व मृद व जलसंधारण विभागातून हे काम करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेला देण्यात आली.आज
चार बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सावरोली अणवीर गावचे सरपंच नरेश शिंगडे, उपसरपंच जयवंत खुलात,मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता संजय कचरे,जलसंधारण अधिकारी रवींद्र कोती,यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रोग्राम लीड नामदेव गुलदगड आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

