सुनावणीस उपस्थित न राहिलेल्या अर्जदारांसाठी पुन्हा सुनावणी तारखा जाहीर,
वसई विरार शहर महानगरपालिकेतील ५५ गावाच्या प्रकरणी अधिसूचनेनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुन्हा समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रू.रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार १४ ते दि.१४ मार्च या कालावधीमध्ये हरकती अर्जांवर जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे १६ ते २० डिसें.पर्यंत सुनावणी सुरु होती.
सदर सुनावणीसाठी हरकती अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहणे कामी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ज्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहता आले नाही,त्यांच्यासाठी पुन्हा सुनावणी तारखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.सदर सुनावण्या जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे २३ ते २६ डिसें.दरम्यान कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) घेण्यात येणार असून संबंधित अर्जदारांनी सदर दिवशी उपस्थित राहावे.
यानुसार 23 डिसें रोजी सत्र क्र.१ सकाळी १० ते १२.३० यावेळेत आगाशी ग्रामपंचायत,सत्र क्र.२ दुपारी १ ते ३ यावेळेत कोफराड व ससूनवघर ग्रामपंचायत, सत्र क्र.३ दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत बापाणे ग्रामपंचायत मधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे.
२४ डिसें.रोजी सत्र क्र.१ सकाळी १० ते १२.३० यावेळेत भुईगाव बुद्रुक,गास तसेच वाघोली,दहिसर, राजोडी ग्रामपंचायत,सत्र क्र.२ दुपारी १ ते ३ यावेळेत भुईगाव खुर्द,गिरिज,कौलार बुद्रुक तसेच वटार,चांदीप ग्रामपंचायत,सत्र क्र.३ दु. ३.३० ते ५.३० यावेळेत कौलार खुर्द,नवाळे,निर्मळ तसेच कशिद कोपर, कसराळी,कोशिंबे ग्रामपंचायत यांमधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येईल.
तसेच २६ डिसें.२०२४ रोजी सत्र क्र.१ सकाळी १० ते १२.३० व सत्र क्र.२ दुपारी १ ते ३ यावेळेत यावेळेत चिंचोटी,कोल्ही ग्रामपंचायत, सत्र क्र.३ दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत चिंचोटी, कामण,कणेर,मांडवी, शिरसाड,सालोली ग्रामपंचायत यांमधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहेत.

