वसंत भोईर,वाडा,
वाड्यात तरूणीवर अत्याचार,तरुण अटकेत,
तालुक्यातील कुडूस येथे परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला वाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ही घटना दोन दिवसांपूर्वी गाळाचा पाड्यातील जंगलात सायंकाळच्या सुमारास घडली.या घटनेनेब सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडूस येथे सदर तरूणी राहत असून ती परिचारिकेचे शिक्षण घेत आहे.तरूणीचे वडील तिला भेटण्यासाठी कुडूस येथे आले होते.तरूणीच्या गावातील तरूणही तेथे दुचाकीवरून आला होता.मी तुम्हाला घरी सोडतो,असे सांगुन त्यांनी दोघांना गाडीवर बसवले आणि त्यानंतर गावाच्या जवळपास नेल्यानंतर त्यांनी तरूणीच्या वडीलांना अर्धा रस्त्यावर सोडले. त्यांना शाॅटकट रस्त्याने घरी जाण्यास सांगितले व तरूणीला मोटारसायकलवर तो घेऊन गेला.त्या तरूणीला तिच्या घरी घेऊन न जाता गाळाचा पाड्यात जंगलात तरूणीच्या केसांना पकडून जबरदस्तीने मारहाण केली व तिच्यावर लैगिक अत्याचार केला.याची वाच्यता कुठे केल्यास जिवे ठार मारू,अशी धमकी देऊन पळून गेला.
त्यानंतर तरूणीने थेट पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलीसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.

