नवीन पाटील,सफाळे,
केळवेरोड येथे मोफत आरोग्य शिबिरा संपन्न,
लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व ढवळे हाँस्पिटल पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यधाम केळवेरोड येथे
आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात परीसरातील शंभरहुन अधिक रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली व गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. याप्रसंगी संघाचे कार्यकारी विश्वस्त सुरेश वर्तक,विश्वस्त नमिता राऊत, संघाचे चिटणीस विविध पाटील, वैद्यकीय सल्लागार डॉ.भार्गव ठाकूर,डॉ.विलास सावे, विश्रामधाम समितीप्रमुख अशोक राऊत,ढवळे हाँस्पिटलचे डॉ.अभिजित त्यांची टीम व परीसरातील मान्यवर उपस्थित होते. आरोग्यधामचे कार्यवाह पंकज म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आरोग्यधामाच्या कार्याची माहीती दिली व समिती प्रमुख जितेंद्र राऊत यानी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

