Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पालघर ; चार विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी १२९ विक्रमगड,१३१ बोईसर,१३२ नालासोपारा व १३३ वसई या चार मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रिय निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे. हितेंद्र ठाकूर,क्षितिज ठाकूर,राजेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांनी आयोगाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.या चारही मतदारसंघातील निकाल पाहून मतदार देखील सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत.वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांचा अवघ्या ३ हजार १५३ मतांनी पराभव झाला होता.१३३ वसई विधानसभा मतदारसंघ हा आ.ठाकूर यांचा गेली तीस वर्षे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.त्या मतदारसंघात नवख्या उमेदवाराकडून त्यांचा…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, साडेसात दशकानंतरही देशासमोर वाढत्या आर्थिक विषमतेचे आव्हान, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपले राज्यकर्ते ” गरिबी हटाव,” चा नारा देत आले.मात्र प्रत्यक्षात गरिबी हटण्याऐवजी गरीबच हटवला गेला.लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी गेल्या साडेसात दशकात सरकारने शेकडो योजना आणल्या.पण अपेक्षित फलित साध्य होऊ शकले नाही.केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील अनेक देशासमोर गरिबीचा प्रश्न आ वासून उभा आहे.जागतिक बँकेने नुकताच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात जगात दीड अब्ज लोक गरिबीतून बाहेर पडल्याचे म्हंटलं आहे.त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा अनेक देशातील अभ्यासकांनी केला आहे.आपल्या देशातील ग्रामीण भागातील वार्षिक दरडोई उत्पन्न ६० हजार इतके आहे.अनेक देशात हे प्रमाण आपल्यापेक्षा कमी आहे.त्यामुळे जगातील गरिबी कमी झाल्याचा जागतिक…

Read More

दीपक मोहिते, ” ग्रामीण भागाचे वास्तव,” मनरेगा योजनेंतर्गत कामे सुरू करा,वेळेवर वेतन द्या अन्यथा आदिवासी समाजाच्या स्थलांतराला वेग, पालघर जिल्ह्यात शेतीची कामे सुरू होईस्तोवर ग्रामीण भागातील ग्रामस्थ विविध क्षेत्रात काम करून रोजगार मिळवत असतात.लाकडाच्या मोळ्या,रानभाज्या व फळे विक्री करून आदिवासी समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो.पावसाळ्यानंतर या आदिवासी मजुरांच्या हाताला काम नसते.त्यामुळे तो रोजगाराच्या शोधात शहरी भागात स्थलांतर करतो.पण ज्यांना स्थलांतरण करणे शक्य होत नाही,अशा आदिवासी कुटुंबातील महिला व शाळकरी विद्यार्थी रस्त्याच्या कड्याला बसून रानभाज्या विकत.या मजुरांच्या हाताला काम विकत असतात.ग्रामीण भागातील आदिवासी लोकांना रोजगार मिळवा,असा उद्देश डोळ्यासमोर काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली रोजगार हमी योजनेचे आता मनरेगा असे करण्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भविष्यात महाविकास व महायुती टिकण्याची शक्यता फार कमी, देशातील सारे प्रादेशिक पक्ष आता ” एकला चलो रे,” अशा निर्णयाप्रत आले आहेत.ठाकरे गटाच्या आमदारांनी,” आघाडी व युती,” करून प्रादेशिक पक्षाला फायदा होत नाही,असे मत नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत व्यक्त केले आहे.याविषयी उद्धव ठाकरे यांनीही अनुकूलता दाखवल्याचे समजते.अशा युती व आघाड्या करणे,राष्ट्रीय पक्षांना फायदेशीर ठरते.प्रादेशिक पक्ष मात्र क्षीण होतात,त्यामुळे प्रादेशिक पक्षाचे आमदार याविषयी नाराज असल्याचे दिसून आले आहे.१९९५ पासून भारतीय मतदारांनी एक पक्षीय सरकार या संकल्पनेला तिलांजली देत युती व आघाडी ही संकल्पना स्विकारली. तत्पूर्वी १९७७ साली जनता दलाचा प्रयोग करण्यात आला,हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला व तत्कालीन पंतप्रधान…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” शिंदे यांचा प्रचंड कोंडमारा ; ” तेलही गेलं आणि तूपही गेलं,हाती आले धुपाटणे,” विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपने मुख्यमंत्री कोण ? हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.हे पद भाजपकडे गेल्याचे स्पष्ट झाले असले तरी मुख्यमंत्री म्हणून अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आलेला नाही.देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. मंत्रिमंडळाचा शपथविधी आता ५ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.प्रचंड बहुमत मिळूनही मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्यास विलंब का होत आहे,याविषयी महायुतीचा घटक पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही.निकालानंतर मुख्यमंत्री पद कोणाला ? यावरून भाजप व एकनाथ शिंदे…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच… लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.कोविड व त्यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्नी न्यायालयात असलेले खटले मार्गी न लागल्यामुळे या निवडणुका गेली चार वर्षे या सर्व निवडणुका रखडल्या.कोविड संपल्यानंतर महायुती सरकारने या प्रश्नी पावले उचलण्याची गरज होती,पण या निवडणुका लवकर झाल्या तर आपला पराभव होईल,अशा भितीमुळे राज्य सरकारने न्यायालयात प्रयत्न केले नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यसरकार आता या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे.साधारणपणे या निवडणुका फेब्रुवारी २५ दरम्यान होतील,असा अंदाज आहे. मुंबई,ठाणे,औरंगाबाद,पुणे, नाशिक,कल्याण-डोंबिवली, वसई-विरार,या महानगरपालिकासह राज्यातील महापालिका आपल्या ताब्यात राहाव्यात,यासाठी महायुती यावेळी जोरदार प्रयत्न…

Read More

दीपक मोहिते, न्यूजलाईन, नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतीवरील कारवाईला सुरुवात, आज नालासोपारा शहरातील सुमारे २ हजार कुटुंबावर आज आभाळ कोसळले आहे.आरक्षण असलेल्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतीवर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने हातोडा चालवला.आज दिवसभरात या पथकाने रिकाम्या करण्यात आलेल्या इमारती जमीनदोस्त केल्या. नालासोपारा पूर्व भागात मौजे आचोळे,सर्वे क्रमांक २२ ते ३२ व ८३ मध्ये डंपिंग ग्राउंड व मलजल प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर काही समाजकंटकांनी ४१ अनधिकृत इमारती चौदा वर्षापूर्वी बांधल्या. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.त्यावर सुमारे गेली दोन वर्षे सुनावणी होऊन काही महिन्यापूर्वी या प्रकरणी न्यायालयाने अंतिम निकाल दिला.निकालात न्यायालयाने या ४१ इमारती तोडण्याचे आदेश दिले…

Read More

दीपअसेक मोहिते, ” न्यूजलाईन,” असे आहेत आपले नवीन आमदार : एक दृष्टीक्षेप, विधानसभेवर निवडून आलेल्या सर्वपक्षीय २८८ आमदारांपैकी ६५ % आमदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत.या आमदारांपैकी ११८ म्हणजेच ४१ % आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत हत्या, अपहरण,हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्हयांची नोंद असल्याचे दिसून आले आहे. या आमदारांमध्ये एकूण २२ महिला आमदार आहेत. वयोमानानुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ ( ७७ वर्षे ), दिलीप सोपल ( ७५ वर्षे ) आणि गणेश नाईक ( ७४ वर्षे ) यांचा क्रम लागतो.तर राष्ट्रवादीचे ( शरद पवार ) रोहित पाटील ( २५ वर्षे ) सर्वात तरुण आमदार आहेत.त्यांच्यापाठोपाठ…

Read More

दीपक मोहिते, त्या ४१ अनधिकृत इमारतीवर आजपासून निष्कासनाची कारवाई, वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती ‘ डी,’ मौजे आचोळे सर्वे नं.२२ ते ३२ व ८३ मधील “डंपिग ग्राऊंड व मलजल प्रक्रिया केंद्र ( एसटीपी, )” साठी आरक्षित असलेल्या आरक्षित भुखंडावर सन २०१० पूर्वी तत्कालिन सिडको नियोजन प्राधिकरणाच्या कार्यकाळात बांधलेल्या ४१ अनधिकृत इमारतीविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका क्र.१५८५३/२०२२ दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालय,मुंबई व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून या ४१ इमारतीवर आजपासुन निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.तरी सदर इमारती लवकरात लवकर खाली करुन वसई विरार शहर महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जे सदनिकाधारक विहित पुरावा सादर करतील,त्यांना…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मनसेचा दारुण पराभव ; राज यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, अखेर मनसेने या निवडणुकीच्या निकालावर आपले मौन सोडले आहे.त्यांच्या एका नेत्याने ” न्यायालय त्यांचे,निवडणूक आयोग त्यांचे,मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ? ” असा प्रश्न उपस्थित करत आपल्या पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडले आहे.तसेच महायुतीने या निवडणुकीत आमची फसवणूक केली,असा थेट आरोप केला आहे.त्यांच्या या म्हणण्यात बिलकुल तथ्य नाही,कारण त्यांचे नेते राज ठाकरे हे गेल्या पंधरा वर्षात आपल्या भूमिका वारंवार बदलत राहिले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबई,नाशिक,पुणे,सिंधुदुर्ग व शहरी भागातील महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतल्या,या प्रचार सभात ते महायुतीचे गुणगान गात होते. तत्पूर्वी ते गुजरात राज्यात जाऊन मोदी…

Read More