संदीप जाधव,बोईसर,
बोईसर – कुंभवली येथे महिलांसाठी विधी व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न,
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघर अंतर्गत कुंभवली ग्रामपंचायत हद्दीत महिलांसाठी विधी व कायदेविषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,बचत गटांच्या महिला तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी सेविकांच्या स्वागत गीत व ईशस्तवनाने करून सरपंच ॲड.तृप्ती संख्ये यांनी महिलांचे हक्क,कायदे व महिलांना उपलब्ध असलेल्या विविध विधीमधील संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.पालघर प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
त्यांनी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचे व त्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कुंभवली ग्रामपंचायत व विभाग मुरबे यांच्या सहकार्याने प्रकल्प पालघर अंतर्गत आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली असून उपस्थित महिलांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहॆ.

