वसंत भोईर,वाडा,
वाड्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या,
तालुक्यातील जामघर, नेहरोली,गातेस,अब्जा या चार ग्रामपंचायतींना वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अमोल पाटील यांच्यावतीने १५ वित्त आयोग ( वंधित निधी ) सन २०२४- २५ मधून चार ग्रामपंचायतींना घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या.त्याचे लोकार्पण काल ग्रामपंचायत जामघर येथे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान या चार घंटा गाड्यांमुळे या ग्रामपंचायती मधील कचरा संकलनाचे काम आता सोपे होणार आहे. स्वच्छ व सुंदर गाव ठेवण्यासाठी या गाड्यांचा मोठा हातभार लागणार आहे. पाटील यांनी केलेल्या या कामाबद्दल या चार ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
यावेळी जामघर ग्रामपंचायतच्या सरपंच दया मोकाशी,सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत गोळे, ग्रामपंचायत सदस्य किरण गोळे,अजय गोळे,दिनेश पाटील,संदीप गोळे, चंद्रकांत वाघचौरे , कांचन गोळे,मनोज चौधरी, साक्षी अगिवले,ग्रामसेविका जान्हवी गायकवाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

