Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, अभ्यास दौरा, वसई विकासिनी दृककला विद्यार्थ्यांची चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट, वसईमधील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आज चित्रकला साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट घेऊन चित्रकलेच्या साहित्य निर्मितीची माहिती घेतली.ही भेट म्हणजे एकप्रकारचा अभ्यास दौराच होता. चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देणारे वसई विकासिनी हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्रे काढून चित्रकलेचा मनमुराद आनंद लुटला. वसईतील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे ५३ विद्यार्थी,६ शिक्षक,वसई विकासिनी संस्थेचे विश्व्स्त सचिव जयंत देसले आणि कार्यकारीणी सचिव विजय वर्तक यांनी उंबरगाव येथील डोम्स कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीचे मालक संतोष रवेशीया त्यांचे चिरंजीव ओम…

Read More

दीपक मोहिते, ३५ व्या वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी, वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची बैठक नुकतीच क्रीडा मंडळ येथे पार पडली. महोत्सवाचे यंदाचे ३५ वे वर्ष असून हा महोत्सव शानदार सोहोळ्यात पार पडावा,यासाठी महोत्सवाचे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करत आहेत.या सोहोळ्यात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वसई,नालासोपारा,विरार, प्रवेशअर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १० डिसें.आहे.मात्र,शाळेतील क्रीडाशिक्षक यांना यावर्षी अतिरिक्त शासकीय कामे असल्या कारणामुळे सदर मुदत चार दिवस वाढवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता क्रीडा मंडळ वसई येथे अर्ज स्विकारण्याची तारीख ही १४ डिसें.संध्या.सात वाजेपर्यंत करण्यात…

Read More

संजय नेवे विक्रमगड, पिकअप जीप व मोटार सायकलच्या अपघातात दोन तरुण ठार, आज सकाळी विक्रमगड-पाली रस्त्यावरील देवमोगरा पेट्रोल पंपानजिक पिकअप जीप व मोटारसायकल यांच्यात टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणाचा मृत्यू झाला. विक्रमगड येथील दोन तरुण वाडा येथून आपल्या मुळगावी जात असताना त्यांनी पिकअप जीपला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत मयत झालेले संदेश लहानु पागी – २५, विजय भंडारी – २४,हे दोघे अनुक्रमे थरोंडा व सारशी येथील रहिवाशी आहेत. या घटनेनंतर पिकअप जीप मधील मजुरांनी या दोघांना तातडीने विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.या दुर्घटनेत विजय भंडारी मयत झाला होता.तर संदेश पागी यांच्यावर प्रथमोपचार करून त्याला जव्हार येथे पुढील उपचारासाठी…

Read More

संजय लांडगे,वाडा शहर, गुरुकुल ग्लोबल स्कूल,वाडा येथे हेल्मेटचे मोफत वाटप, वाडा तालुक्यातील वाडा निर्मिती एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या गुरुकुल ग्लोबल स्कूल आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या सौजन्याने काल पालक व पाल्य यांच्यासाठी मोफत हेल्मेट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः दुचाकीच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकी चालवताना दुचाकी चालक व मागे बसलेल्या सह प्रवाशानेही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळणे व सुरक्षित प्रवास करण्यासाठी हेल्मेट अत्यावश्यक झाले आहे.त्याचे गांभीर्य लक्षात घेवून शाळा व…

Read More

दीपक मोहिते, भाग क्र.४ विकासाचा मार्ग, ग्रामीण भागातील रस्तेबांधणीवर खा.डॉ.हेमंत सवरा यांनी भर द्यावा, ग्रामीण भागाचा विकास,हा रस्त्याच्या माध्यमातून होत असतो,स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने रस्तेबांधणी,या महत्वाच्या विकासकामावर हजारो कोटी रु.खर्च केले.मात्र आजही ग्रामीण भागातील अनेक समस्यांना गावपाड्यावर राहणाऱ्या जनतेला केवळ पायवाटांचाच आधार आहे.ग्रामीण भागातील रस्ते बांधण्याकामी एकाही सरकारने स्वारस्य न दाखवल्यामुळे ग्रामीण भागात उद्योगधंदे वाढीला चालना मिळू शकली नाही.परिणामी भूमिपुत्रांच्या मुलाबाळांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.आज ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार मिळवण्यासाठी शहरी भागाकडे धाव घेत आहेत.ग्रामीण भागातील खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होतो,ही संकल्पना हल्ली मोडीत निघाली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहरासोबत ग्रामीण भागाचा चेहरा…

Read More

अमित नाईक,वसई, वसई तालुक्याची आढावा सभा संपन्न, आज पंचायत समिती वसई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रविंद्र शिंदे,यांनी गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी ( पंचायत ), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत,चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर, प्रदिप डोलारे,गटविकास अधिकारी,पंचायत समिती कार्यालय वसई तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंत राबवण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना, व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांची अपूर्ण घरकुले माहे जाने.२०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुचना दिल्या. लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण…

Read More

अनिल वैद्य,नाशिक, नाशिक येथे लष्कराचे ” नो युवर आर्मी,” प्रदर्शनाचे आयोजन, विद्यार्थ्यांना आणि तरुण पिढीला भारतीय सैन्य दलाच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी आणि देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने नाशिक येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. येथील आर्टिलरी सेंटरतर्फे गुरुगोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात मांडण्यात आलेल्या ” नो युवर आर्मी,” अर्थात ” आपल्या सैन्य दलाला जाणून घ्या,” या प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले.यावेळी गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष बलबीर सिंग छब्रा हे उपस्थित होते.देशातील युवक – युवतीना भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,युवकांनी देशसेवेमध्ये सामील…

Read More

संजय नेवे,विक्रमगड, साखरे देहर्जे प्रकल्पबाधित लोकांचे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर, विक्रमगड तालुक्यातील साखरे हद्दीवर देहर्जे प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.या बांधकाम सुरू होऊन दोन वर्षे झाली असून तरी अजून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र अद्याप मार्गी लागलेले नाहीत. या प्रकल्पासाठी वनविभागाची ४४५ हे. तर शेतकऱ्यांची २३४ हे.जमीन अशी एकूण ६८० हे.जमीन संपादित होणार आहे.या प्रकल्पासाठी साखरे,खुडेद, जांभा व सुकसाळे या ग्रामपंचायत हद्दीतील ३७४ प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.या प्रस्तावित धरणात एकूण ३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. हे पाणी वसई विरार महानगरपालिका देण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा आम्हाला काय उपयोग ? असा सवाल प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित…

Read More

संजय लांडगे, वाडा शहर, गावपाड्यांना जोडणारे साकाव व पक्के रस्त्याची गरज, पालघर जिल्हातील अनेक आदिवासी गावपाडे विकासापासून वंचित असून अनेक पाड्यांवर धड चालायला रस्ते नाहीत,देश डिजिटल होत असताना ग्रामीण भागातील जनतेला आजही पायावाटाचांच आधार घ्यायला लागत आहे,अशी खंत समाजिक कायकर्ते अनंता वनगा यांनी व्यक्त केली आहे. वनगा यांनी जव्हार तालुक्यातील आपटाळे गावात भेट देऊन आपटाळे ते वनवासी गावा दरम्यान असणाऱ्या ओहोळाची पाहणी केली.या गावांमधील स्थानिक रहिवाश्यांनी केलेल्या मागणीनुसार या ओहोळात साकाव उभारल्यास दोन्ही गावांना व आजुबाजुच्या गाव पाड्यांचा दळण-वळणाचा प्रश्न मार्गी लागेल,असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी वनगा यांनी प्रकल्प अधिकारी जव्हार यांना निवेदन दिले व आदिवासी घटक योजनेअंतर्गत साकाव…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कोणत्याही रंगाला करदात्यांचा आक्षेप नाही,पण सलोख्याचे वातावरण बिघडवू नका, रंगात काय ठेवलं आहे.रंग हा इतर कोणत्याही रंगात मिसळला की तो वेगळा दिसायला लागतो,हे सारे रंग जेंव्हा एकत्र येतात,तेंव्हा मन मोहून टाकणारे इंद्रधनुष्य आकाराला येते.तेही क्षणिक डोळ्यांना सुख देते व आसमंतात विलीन होऊन जाते.पावसाळ्यात पाहायला मिळणाऱ्या इंद्रधनुष्य माझा प्रत्येक रंग निरपेक्ष असतो,हे दाखवून देत असतो.असो,आज मी साहित्याच्या भाषेत का बोलतोय ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना ? त्याला कारणही तसच आहे.महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आता रंगाची ॲलर्जी होवू लागली आहे.कारण,सत्तेत परिवर्तन घडल्या,घडल्या पिवळा व हिरव्या रंगाची त्यांना उपरती झाल्याचे दिसून आले आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे उद्या…

Read More