संजय लांडगे, वाडा शहर,
गावपाड्यांना जोडणारे साकाव व पक्के रस्त्याची गरज,
पालघर जिल्हातील अनेक आदिवासी गावपाडे विकासापासून वंचित असून अनेक पाड्यांवर धड चालायला रस्ते नाहीत,देश डिजिटल होत असताना ग्रामीण भागातील जनतेला आजही पायावाटाचांच आधार घ्यायला लागत आहे,अशी खंत समाजिक कायकर्ते अनंता वनगा यांनी व्यक्त केली आहे.
वनगा यांनी जव्हार तालुक्यातील आपटाळे गावात भेट देऊन आपटाळे ते वनवासी गावा दरम्यान असणाऱ्या ओहोळाची पाहणी केली.या गावांमधील स्थानिक रहिवाश्यांनी केलेल्या मागणीनुसार या ओहोळात साकाव उभारल्यास दोन्ही गावांना व आजुबाजुच्या गाव पाड्यांचा दळण-वळणाचा प्रश्न मार्गी लागेल,असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी वनगा यांनी प्रकल्प अधिकारी जव्हार यांना निवेदन दिले व आदिवासी घटक योजनेअंतर्गत साकाव व रस्ते तात्काळ मंजुर करावेत,अशी मागणी केली.यावेळी आपटाळे ग्रामपंचायत सदस्य भाऊ दिघे तसेच रविदास दिघे,रघुनाथ दिघे,नवश्या दिघे, केशव दिघे,रामा दिघे,ऋतिक दिघे तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

