अमित नाईक,वसई,
वसई तालुक्याची आढावा सभा संपन्न,
आज पंचायत समिती वसई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रविंद्र शिंदे,यांनी गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी ( पंचायत ), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत,चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर, प्रदिप डोलारे,गटविकास अधिकारी,पंचायत समिती कार्यालय वसई तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना
सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंत राबवण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना, व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांची अपूर्ण घरकुले माहे जाने.२०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुचना दिल्या. लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण करत नसतील तर सदर घरकुलांना वाटप केलेले अनुदान शासन खाती भरणा करुन सदरची घरकुले रद्द करावीत तसेच सन २०२४-२५ वर्षातील सर्व योजनांची घरकुले माहे मार्च २०२५ अखेर पर्यंत पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.अशा सूचना रविद्र शिंदे यांनी दिल्या.
शासकीय जमिनीवरील घरकुलांबाबत शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करुन प्रलंबित घरकुले पूर्ण करण्यात यावीत,असेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
ग्रामपंचायत विभागामधील जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत सन २०२३-२४ वर्षातील अपूर्ण कामे १५ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत,मंजूर कामे माहे मार्च २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करावी, २०२५-२६ चे आराखडे सादर करताना शासन निर्णयाप्रमाणे कामे घेण्यांत यावीत,तसेच ग्रामपंचायतीकडील शिल्लक रक्कमे इतकीच कामे प्रस्तावित करण्याची दक्षता घेण्यात यावी.शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभा घेण्याची दक्षता घेणेत यावी,१५ वा वित्त आयोगांतर्गत बंधित व अबंधित सन २०२०-२१ ते २०२३-२४ पर्यंतची सर्व कामे पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.
१५ वा वित्त आयोगांतर्गत कामांवरील शासकीय वजातींचा भरणा संबंधित खात्यांवर करण्याची दक्षता घेणे,ग्रामपंचायतीमधील सर्व घरपट्टी धारकांना घरपट्टी आकरणी देयकांची बजावणी ९ डिसेंबर पर्यंत पूर्ण करुन तसा अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करावा,ग्रामपंचायतीकडील कर वसुली १००% पूर्ण करण्याची कार्यवाही अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
सर्व ग्रामपंचायतींनी शासनाने नेमलेल्या निविदाकाराकडून कचराकुंड्या, ई-व्हेईकल खरेदी करणेबाबत कार्यवाही करणे,वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये पूर्ण करणे,
सार्वजनिक शौचालयांतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाचा आढावा घेते वेळी देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी यावेळी सर्व योजनांची कामे मार्च २०२५ अखेर पूर्ण करुन १००% खर्च नोंदवणेबाबत सूचना दिल्या. सर्व विभागांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
या बैठकीस हनुमंत कांबळे, उपविभागीय अभियंता (बांधकाम) पंचायत समिती वसई,गटशिक्षण अधिकारी,विस्तार अधिकारी उपस्थित होते.

