संजय नेवे,विक्रमगड,
साखरे देहर्जे प्रकल्पबाधित लोकांचे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर,
विक्रमगड तालुक्यातील साखरे हद्दीवर देहर्जे प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.या बांधकाम सुरू होऊन दोन वर्षे झाली असून तरी अजून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र अद्याप मार्गी लागलेले नाहीत.
या प्रकल्पासाठी वनविभागाची ४४५ हे. तर शेतकऱ्यांची २३४ हे.जमीन अशी एकूण ६८० हे.जमीन संपादित होणार आहे.या प्रकल्पासाठी साखरे,खुडेद, जांभा व सुकसाळे या ग्रामपंचायत हद्दीतील ३७४ प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.या प्रस्तावित धरणात एकूण ३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
हे पाणी वसई विरार महानगरपालिका देण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा आम्हाला काय उपयोग ? असा सवाल प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित करत असून या प्रकल्पाचे ७५ % काम पूर्ण होत आले आहे.पण जमिनीचा मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी प्रकल्पग्रस्त शेतकरी कडून होत आहेत.आमचे पुनर्वसन करा व बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला लवकरात लवकर द्या,अशी मागणी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी करत आहेत.परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे. तसेच ५० ते ६० ग्रामस्थांची फक्त घरे जात असल्यामुळे त्यांना त्यांच्या जमिनीतच पुनर्वसन करावे,अशी मागणी करण्यात येत आहे.

