संजय लांडगे,वाडा शहर,
गुरुकुल ग्लोबल स्कूल,वाडा येथे हेल्मेटचे मोफत वाटप,
वाडा तालुक्यातील वाडा निर्मिती एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या गुरुकुल ग्लोबल स्कूल आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या सौजन्याने काल पालक व पाल्य यांच्यासाठी मोफत हेल्मेट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः दुचाकीच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दुचाकी चालवताना दुचाकी चालक व मागे बसलेल्या सह प्रवाशानेही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळणे व सुरक्षित प्रवास करण्यासाठी हेल्मेट अत्यावश्यक झाले आहे.त्याचे गांभीर्य लक्षात घेवून शाळा व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक यांना हेल्मेट वितरण करण्यात आले.
सदर हेल्मेट वितरणावेळी पालकांचे वाहतूक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र,यांची तपासणी करून तसेच त्यांना वाहतुकीचे नियम समजून सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर माळकर व मयुरेश अंबाजी तसेच सेवा सहयोग फाउंडेशनचे सागर फरळे व गुरुकुल ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष योगेश गंधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हेल्मेट वाटप करण्याआधी पोलीस अधीक्षक मयुरेश अंबाजी यांनी उपस्थित सर्व पालक व विद्यार्थ्यांना वाहतुकीचे महत्त्व समजावून देत दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले.

