Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विरार पूर्व मनवेलपाडा येथे कोकण महोत्सवाचे आयोजन, बहुजन विकास आघाडी,श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांच्यातर्फे आर्टिवल फाउंडेशन यांच्या सहकार्याने रवि.१२ ते बुध.२२ ऑक्टों. २०२५ या कालावधीमध्ये ” आम्ही विरारकर,” कोकण महोत्सव व खास दीपावलीनिमित्त दिवाळी बाजारपेठेचे मनवेलपाडा तलाव,विरार पूर्व येथे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आम्ही विरारकर कोकण महोत्सवात पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धाची रेलचेल आहे. वरील नमूद विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रशांत राऊत कार्यालय, ९९२३७०९१९१, प्रशांत लाड ७३७८९२११४१, निकिता सामंत, ८६९८९९४४४२,या क्रमांकावर संपर्क साधावा. महोत्सवात आयोजित करण्यात आलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रोज सायं.७.०० वा.सुरू होणार आहेत.काही कारणास्तव कार्यक्रमाच्या वेळेत…

Read More

दीपक मोहिते, इनसाईड स्टोरी, व्हेनेझूएलाच्या मारिया कोरीना मचाडो यांना २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान, नॉर्वेजियन नोबेल समितीने २०२५ सालचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरीना माचाडो यांना देण्यात आला आहे.हा सन्मान त्यांना “ लोकशाही हक्कांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल,” आणि “ हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे शांततामय वाटचाल करण्यासाठी २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना माचाडो या कोण आहेत ? समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की “ २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार धैर्यवान आणि निष्ठावान स्त्रीला दिला जात आहे,ज्यांनी अंधाराच्या काळातही लोकशाहीची ज्योत प्रज्वलित ठेवली.” घोषणेनंतरपूर्वी काही माध्यमांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळू शकतो,अशी…

Read More

वाडा प्रतिनिधी, बससेवा झाली सुरू,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,” तालुक्यातील कळंभे ग्रामपंचायत क्षेत्रातील निशेत या पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.हा रस्ता यंदाच्या पावसाळ्यात पूर्णपणे खड्ड्यात गेला असून त्यामुळे बससेवा बंद झाली होती.सदर बससेवा तत्काळ सुरू करण्यात आली,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,” अशीच असून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरुस्ती करण्यास चालढकलपणा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कळंभे ग्रामपंचायत हद्दीत निशेत व ठाकूरपाडा असे दोन पाडे आहेत.या पाड्यावर बससेवा होती.मात्र हा रस्ता पावसाळ्यात खड्ड्यात गेला असून रस्त्यावर जागोजागी दोन ते अडीच फुटांचे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या महामार्गावरील बससेवा बंद करण्यात आली.मात्र रस्त्याच्या दुर्दशेबाबत व शाळेत जाणा-या विद्यार्थाची…

Read More

दीपक मोहिते, भाजपला रोखणे,ठाकरे बंधूंना शक्य होणार नाही,बविआ देखील सध्या संभ्रमावस्थेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी राज्यस्तरावर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना,या दोन पक्षात युती होण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे.या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) सोबत घेण्यासंदर्भात सेनेचे नेते खा.संजय राऊत प्रयत्नशील आहेत.तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मात्र मनसेला सोबत घेऊन निवडणुका लढण्यास तयार नाही.त्यामुळे आजच्या घडीला भारतीय राष्ट्रीय पक्ष स्वबळावर रिंगण्यात उतरण्याच्या तयारीत आहे.शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील या दोघा ठाकरे बंधू सोबत जातील,असे वाटत नाही. या सर्व घडामोडीकडे भाजप मात्र बारकाईने पाहत असून सेना – मनसे यांचे एकत्र येणे,हे…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम २०२५, पालघर जिल्ह्यात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलीच हवा दिली आहे.काल विविध पक्षाचे दोन ते हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख भरत रजपूत,खा.डॉ.हेमंत सवरा व आ.हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते.आजचा हा प्रवेश सोहोळा हा आगामी निवडणुकांमध्ये मित्रपक्षासह विरोधकांना इशारा देणारा असल्याचे मानले जात आहे.या सोहोळ्यानंतर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला उत येण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सारे राजकीय पक्ष सावध झाले आहेत. मुंबईला लागून असलेल्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्ली प्रचंड तणावाखाली आहेत… सहकारी मंत्र्यांच्या उचापतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तणावाखाली आले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटील कारस्थानामुळे हवालदिल झालेले शिंदे गृहराज्यमंत्री योगेश कदम व त्यांचे वडील रामदास कदम या दोघांमुळे सध्या प्रचंड तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे.आज सकाळपासून योगेश कदम हे शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याच्या आवारात गेल्या दोन तासापासून ताटकळत बसले आहेत.पण,शिंदे काही पहिल्या मजल्यावरून खाली आले नाहीत.शिंदे हे कदम पितापुत्रावर प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात आपल्या विरोधात असलेले खटले तसेच मंत्रिमंडळात फडणवीस यांचे दबावाचे राजकारण,अशा द्विधा मनस्थितीत असताना कदम पितापुत्राच्या…

Read More

वाडा प्रतिनिधी, महाविकास आघाडीचा करवाढीविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा, वाडा नगरपंचायतीतर्फे निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणीच्या नोटीशा बजावण्यात आल्या असून पूर्वीच्या करापेक्षा दुप्पट तिपटीने करवाढ केली आहे.या वाढीव करवाढीचा बोजा नागरिकांना पडणार असल्याच्या निषेधार्थ व कर वाढ रद्द करावी,या मागणीसाठी आज महाविकास आघाडीतर्फे वाडा नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.वाढीव करवाढ रद्द न केल्यास दिवाळी सण नगरपंचायत कार्यालयात साजरी करू,असा इशारा नेत्यांनी प्रशासनाला दिला. वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली व दुय्यम दर्जाची ग्रामपंचायत असून त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबत वृक्ष कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,अग्निशमन कर,उपयोग कर्ता अशा अतिरिक्त करामध्ये वाढ झाली आहे.अचानक झालेल्या करवाढीमुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे.…

Read More

दीपक मोहिते, आम्हाला पैश्याची उधळपट्टी करणारी मॅरेथॉन स्पर्धा नको,आम्हाला दर्जेदार नागरी सुविधांची गरज आहे… स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेची १३ वी मॅरेथॉन स्पर्धा प्रशासनाने तात्पुरती स्थगित केली आहे.मनपा प्रशासनाचा हा निर्णय स्तुत्य असला तरी याविषयी करदात्यांच्या मनात अनेक प्रश्नाचे काहूर उठले आहे.आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ते कारण खरं नाही.तालुक्यातील रस्त्याची झालेली पार दुर्दशा हे कारण,या निर्णयामागे असावा,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक ही मॅरेथॉन स्पर्धा आर्थिकदृष्ट्या बोजवारा उडालेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला परवडणारी नाही.पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गेली बारा वर्षे या स्पर्धेवर कोट्यवधी रु.ची उधळपट्टी झाली.गेल्या बारा वर्षात…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आपला देश कधीही ” आत्मनिर्भर,” होऊ शकणार नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परकीय नागरिकांसंदर्भात जी काही भूमिका घेतली आहे,ती त्यांच्या देशाच्या हिताची आहे. आज त्यांच्या देशात लाखो आशियाई स्थायिक झाले आहेत.त्याचा परिणाम रोजगार व त्यांच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे.त्यामुळे ट्रम्पच्या सरकारने विजा विषयक कायदे कडक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरात सध्या स्थानिक व स्थलान्तरीत,असा वाद वेगाने रंगू लागला आहे.अमेरिकमध्ये ट्रम्प सरकार पुन्हा सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या वादाला अधिक गती मिळाली व त्याचे अल्पावधीत उमटलेले पडसाद आपण पाहिले.अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.या सर्व घडामोडीमागे बेरोजगारी व आर्थिक स्तर अशी…

Read More

वाडा प्रतिनिधी, वाडा येथे फटाके व्यापाऱ्याकडून खंडणी घेताना एकाला रंगेहाथ पकडले, वाडा शहरातील दिलीप ट्रेडर्स या फटाके विक्रेत्याकडून खंडणी वसुल करताना वाड्यातील एका इसमाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.सदर घटना काल साडेआठच्या सुमारास वाडा मारूती मंदिराच्या मागे वाडा परळी रोडवरील प्रितम सेल्स एजन्सी यांच्या फटाका स्टाॅल समोर घडली.या घटनेने वाडा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. निलेश चव्हाण रा.पाटील आळी,वाडा असे त्या खंडणीखोराचे नाव आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी निलेश चव्हाण याने त्याच्या स्वतःच्या मोबाईलवरून फिर्यादी सुशील पातकर यांना व्हाॅटसअप करून फटाके विक्रीचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचेकडे १४ लाख ७० हजार रू.ची मागणी केली…

Read More