दीपक मोहिते,
इनसाईड स्टोरी,
व्हेनेझूएलाच्या मारिया कोरीना मचाडो यांना २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान,
नॉर्वेजियन नोबेल समितीने २०२५ सालचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरीना माचाडो यांना देण्यात आला आहे.हा सन्मान त्यांना “ लोकशाही हक्कांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल,” आणि “ हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे शांततामय वाटचाल करण्यासाठी
२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना माचाडो या कोण आहेत ?
समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की “ २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार धैर्यवान आणि निष्ठावान स्त्रीला दिला जात आहे,ज्यांनी अंधाराच्या काळातही लोकशाहीची ज्योत प्रज्वलित ठेवली.”
घोषणेनंतरपूर्वी काही माध्यमांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळू शकतो,अशी चर्चा सर्वत्र होत होती.पण तो
लोकशाहीची निडर लढवय्या
माचाडो यांना जाहीर झाला. त्यांना व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीतील प्रमुख चेहरा असे मानले जाते. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी निकोलस मादुरो यांच्या दडपशाही राजवटीविरुद्ध सातत्याने आवाज उठवला आहे.धमक्या,अटक,आणि राजकीय छळ सहन करूनही त्या व्हेनेझुएलामध्येच राहून नागरिकांना शांततामय लढ्याची प्रेरणा देत राहिल्या.
त्या एकत्रित विरोधी पक्षांची एकात्मता साधणारी शक्ती ठरल्या असून,त्यांनी विविध मतांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून लोकशाहीसाठी व्यापक जनआंदोलन उभं केलं.२०२४ च्या वादग्रस्त निवडणुकीदरम्यान,ज्यावेळी शासनाने त्यांच्या उमेदवारीवर बंदी घातली होती,त्यावेळी त्यांनी सरकारच्या दडपशाहीला भीक न घालता विरोधी उमेदवार एडमुंडो गोनझालेझ उर्रुतिया यांना पाठिंबा दिला होता.

