दीपक मोहिते,
विरार पूर्व मनवेलपाडा येथे कोकण महोत्सवाचे आयोजन,
बहुजन विकास आघाडी,श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांच्यातर्फे आर्टिवल फाउंडेशन यांच्या सहकार्याने रवि.१२ ते बुध.२२ ऑक्टों. २०२५ या कालावधीमध्ये ” आम्ही विरारकर,” कोकण महोत्सव व खास दीपावलीनिमित्त दिवाळी बाजारपेठेचे मनवेलपाडा तलाव,विरार पूर्व येथे आयोजन करण्यात आले आहे.
बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आम्ही विरारकर कोकण महोत्सवात पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धाची रेलचेल आहे.
वरील नमूद विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रशांत राऊत कार्यालय, ९९२३७०९१९१,
प्रशांत लाड ७३७८९२११४१,
निकिता सामंत, ८६९८९९४४४२,या क्रमांकावर संपर्क साधावा.
महोत्सवात आयोजित करण्यात आलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रोज सायं.७.०० वा.सुरू होणार आहेत.काही कारणास्तव कार्यक्रमाच्या वेळेत बदल झाल्यास त्याची पूर्वसूचना देण्यात येईल.
चित्रकला स्पर्धा व्यतिरिक्त इतर सर्व स्पर्धा आम्ही विरारकर कोकण महोत्सव मनवेलपाडा तलाव येथे पार पडतील.

