सचिन सावंत,विरार
विवा महाविद्यालयात “श्रावणधारा” स्पर्धेचे यशस्वी आयोजन,
विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी
दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.याच परंपरेत याही वर्षी “ श्रावणधारा,” या कार्यक्रमांतर्गत चित्रकला व लोकगीत गायन या दोन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,असे तीन गट सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी एकूण ९७ जणांनी नोंदणी केली होती.स्पर्धांचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ ग्रंथालयाच्या वाचन कक्षात नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा,प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे व ग्रंथालय समिती सदस्या डॉ.निलीमा भागवत उपस्थित होत्या.
समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदन नंतर ग्रंथपाल डॉ.नागरत्ना पलोटी यांच्या प्रास्ताविकतेने झाली.समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अंजली परांजपे यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी ग्रंथालय समिती सदस्य, ग्रंथालय कर्मचारी वर्ग, विद्यार्थी समिती यांनी विशेष मेहनत घेतली.

