दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्ली प्रचंड तणावाखाली आहेत…
सहकारी मंत्र्यांच्या उचापतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तणावाखाली आले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटील कारस्थानामुळे हवालदिल झालेले शिंदे गृहराज्यमंत्री योगेश कदम व त्यांचे वडील रामदास कदम या दोघांमुळे सध्या प्रचंड तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे.आज सकाळपासून योगेश कदम हे शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याच्या आवारात गेल्या दोन तासापासून ताटकळत बसले आहेत.पण,शिंदे काही पहिल्या मजल्यावरून खाली आले नाहीत.शिंदे हे कदम पितापुत्रावर प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात आपल्या विरोधात असलेले खटले तसेच मंत्रिमंडळात फडणवीस यांचे दबावाचे राजकारण,अशा द्विधा मनस्थितीत असताना कदम पितापुत्राच्या उचापतीमुळे सध्या त्रस्त झाले आहेत.संजय शिरसाठ,भरत गोगावले,संजय गायकवाड व संजय राठोड या सहकाऱ्यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा प्रचंड खालावली असताना योगेश कदम यांचे सचिन धायवळ या गुंडाला शस्त्रपरवान्यासाठी शिफारस पत्र देणे,तत्पूर्वी रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी बेलगाम वक्तव्ये करणे,हे पक्षाच्या चांगलेच अंगलट आले आहे.शिवसेनेचे अनिल परब यांनी शिंदे यांचा पक्ष व या दोघा पितापुत्राची लक्तरे चांगलीच वेशीला टांगल्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड तणावाखाली आले आहेत.अशा परिस्थितीमध्ये योगेश कदम हे शिंदे यांच्या भेटीसाठी आज त्यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर आले आहेत.पण शिंदे,त्यांना भेटण्यासाठी पहिल्या मजल्यावरून खाली आले नाहीत.कदम हे गेल्या दोन तासापासून तळमजल्यावरील हॉल मध्ये बसून आहेत.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निकाल आपल्या विरोधात जाण्याची शक्यता,फडणवीस यांची आपल्या विरोधात सुरू असलेली कटकारस्थाने व दिल्ली दरबारी कमी झालेले वजन,आदी कारणामुळे शिंदे सध्या त्रस्त झाले आहेत.दुसरीकडे पालघरचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनीही त्यांच्याविरोधात चांगलीच आघाडी उघडली आहे.त्यामुळे शिंदे यांची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाली आहे.

