- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- आयाराम गयारामचे आवागमन तूर्तास थंडावले आहे…
- आम्हा मतदारांची ” सनद, “
- स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ?
- कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक,
- राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज….
- जेंव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…
- बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.सं.च्या निवडणुका लांबणीवर पडतील…
- एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा भाताचे भारे बांधण्याच्या बंध विक्रीतून मिळतोय आदिवासींना रोजगार, शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध ( बांबूपासून तयार केलेला दोर ) विक्रीतून अनेक आदिवासी कुटुंबियांना किमान दोन महिने चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील चारशेहून अधिक कुटुंबांचे उपजिविकेचे हे एक साधन बनले आहे. भात कापणी हंगामाला सुरुवात झाल्याने येथील आदिवासींचा बंध विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे,तर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर भाताचे नुकसान केल्याने अनेक शेतकऱ्यांनी बंधचा वापर केला नव्हता.यंदा मात्र भात पिकाचे चांगले उत्पन्न आल्याने भारे बांधण्यासाठी बंधची मागणी वाढली आहे. बहुतांश शेतकरी ५०० ते १००० बंध खरेदी करतात. त्यामुळे वाडा,विक्रमगड तालुक्यातील शेकडो आदिवासींना चालू वर्षी चांगला…
वसंत भोईर, वाडा दिवसभर काम,पण मिळेना पगार…किती दिवस बिनपगारी राबणार ? ग्रामपंचायत स्तरावर महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकीत राहिल्याने सेवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने जरी मासिक आठ हजार रु.मानधन व दोन हजार रु.प्रवास व प्रोत्साहन भत्ता जाहीर केला असला,तरी प्रत्यक्षात अनेकांना हे मानधन अद्याप मिळालेले नाही. परिणामी,ग्रामरोजगार सेवक बिनपगारी काम करीत आहेत. ग्रामरोजगार सेवक हे ग्रामपंचायतीचे समन्वयक म्हणून काम करतात.वैयक्तिक लाभाच्या योजनापासून ते सार्वजनिक कामांच्या लेखाजोख्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. हे अर्धवेळ काम असले तरी प्रत्यक्षात त्यांना दिवसभर पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागते. दरम्यान,महिनो महिने मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी त्यांच्यापुढे…
दीपक मोहिते, ” राजकीय उलथापालथी,” बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते फोडण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात पक्ष सोडणे व दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे,या अशा अवैध प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे.कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुका जिंकायच्याच,या इर्षेने पेटलेल्या भाजपने महायुती सरकारमधील घटक पक्षासह इतर राजकीय फोडण्याचे जोरदार सत्र आरंभले आहे.त्यांच्या या उलाढालीला इतर पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चांगलेच बळ मिळत आहे.एकीकडे भाजप,आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना दुसरीकडे इतर पक्ष मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.वसई तालुक्यात भाजपने गेल्या तीन महिन्यापासून बहुजन विकास आघाडीला चांगलेच लक्ष्य केले आहे.या काळात त्यांच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी…
वसंत भोईर, वाडा ग्रामस्थानी तब्बल तीन तास रोखला खानिवली- कंचाड रस्ता, वाडा तालुक्यातील खानिवली – कंचाड रस्त्याची पूर्ण वाताहात होऊन ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा व अवजड वाहतूक बंद करा या मागणीसाठी काल देवळी फाटा येथे ग्रामस्थांनी रोको आंदोलन केले. दरम्यान वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. खानिवली – कंचाड या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघात वाढले असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे.तत्पूर्वी अनेक वेळा अर्ज विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आज अखेर या परिसरातील ग्रामस्थांनी…
दीपक मोहिते, वसई तालुक्यात मीटर रिक्षा सुरू होणार — आ.स्नेहा दुबे पंडित वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेमुळे येथील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र,वसई विरार शहरात अद्यापही मीटर रिक्षा नसल्याने शेअर रिक्षाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही.त्यातच शेअर रिक्षा सेवेच्या मनमानी भाडे आकारणे तसेच फक्त मुख्य रस्त्यावर शेअर रिक्षा चालवणे,इ.कारणामुळे वयोवृध्द नागरिक,महीला,विद्यार्थी यांना वसाहतीतील आतील भागामध्ये जाण्यासाठी पायी चालत जावे लागते.बऱ्याच वेळा सामानासह पायी चालत जाणे नागरिकांना अडचणीचे होत असते. मीटर रिक्षाच्या समस्येबरोबरच शहरामध्ये वाहनांची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो.वसई – नालासोपारा-विरार या स्थानकांच्या बाहेरच्या भागात प्रचंड वाहतूक…
सचिन सावंत,वसई विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, वसई विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.या सर्वांचे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी स्वागत केले व पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा सरचिटणीस ऍड.कुणाल कांदे,उपविभागप्रमुख निखिल हाटे,शाखाप्रमुख जयेश सोळंकी,सलमान साठे,फैझल काझी,शहराध्यक्ष ऍड. योगेश जाधव,ऍड.निलेश शिर्के,यतीन चोरघे,कौस्तुभ राऊत,विरल राजाणी,अकसना शेख,आकाश बोराणा, रोहित मालवणकर,सूरज माझी,जुबेर पठाण व ७० ते ८० कार्यकर्त्यांचा समावेश होता.याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
वसंत भोईर, वाडा वाड्यात हळवार भातपिक कापणीला जोमाने सुरुवात, जिल्ह्यातील भातपिक कापणीस तयार झाले असून वाडा तालुक्यातील शेतक-यांनी हळवार भातपिक कापणीला जोमाने सुरुवात केली आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळवार भातपिकाची लागवड करीत असतात.हे भातपिक ९० ते ११५ दिवसांच्या कालावधीत कापणीस तयार होत असते.हळवार भातपिक कापणीची ( लाणी ) लगबग सुरु असून येथील शेतकऱ्यांना अद्याप पावसाची भीती सतावत असल्यामुळे भातकापणीच्या ( लाणी ) काही नैसर्गिक नियमांना बगल देत कापणी सोबत एका बाजुला घाईघाईने झोडणीच्या कामालाही सुरुवात केली आहे.लहरी पावसाचा काही नेम नसल्याने तो कधीही पडू शकतो.या अशा भीतीच्या सावटाखाली शेतकरी असून प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेत तात्पुरत्या स्वरुपाचे शेतखळे तयार करून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकनाथ शिंदे गटाची अवस्था सध्या ” इकडे आड,तिकडे ईडी,” अशी झाली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या भाषणात अचानकपणे ” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीमध्ये शक्यतो सोबत लढू,पण जेथे शक्य होणार नाही,तेथे समोरासमोर लढू, ” असे सांगत महायुतीमधील घटक पक्षांना एकप्रकारे गर्भित इशाराच दिला आहे.फडणवीस यांचे मुंबई,ठाणे,नवी मुंबई,छत्रपती संभाजीनगर व पुणे,या चार महानगरपालिकांवर कावळ्याची नजर आहे.कोणत्याही परिस्थितीत सोन्याची अंडी देणाऱ्या या चार महानगरपालिकेच्या सत्तेत इतर कोणी वाटेकरी होता कामा नये,यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेता,त्यांना बऱ्यापैकी यश मिळण्याची शक्यता आहे.या प्रयत्नात त्यांना जर चांगले यश…
दीपक मोहिते, शह -प्रतिशह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ; भाजप कामाला लागला… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करील,अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत होती.गेल्या सात दिवसापासून भाजपमध्ये दाखल होणाऱ्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लागलेल्या रांगा,लक्षात घेता तो अंदाज आता खरा ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.काल वसई व पालघर जिल्ह्यात भाजप व शिवसेनेने ( शिंदे गट ) या दोन्ही पक्षांनी ” इनकमिंग इव्हेंटस,” चे आयोजन केले होते. गेल्या तीन महिन्यात भाजपने इतर पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्याना प्रवेश देऊन पक्षफोडीला सुरुवात केली आहे.हे करत असताना,भाजपने महायुतीमधील आपला सहकारी पक्ष शिवसेनेलाही लक्ष्य केल्यामुळे शिंदे यांच्या गटात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेती उध्वस्त ; सरकार मात्र साखरझोपेत… गेल्या महिन्यात राज्याभरात झालेल्या अतिवृष्टीमध्ये राज्याच्या सुमारे बारा ते जिल्ह्यातील ७६ लाख हेक्टर जमिनीवरील शेती आडवी झाली.अंदाजे ७ लाख शेतकरी या अस्मानी संकटात देशोधडीला लागले.पण,सरकार मात्र आपल्याच धुंदीत असल्याचे पाहायला मिळत आहे.इतके असंवेदनशील सरकार आजवर तुम्हा आम्हाला पाहायला मिळाले नाही.शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या अस्मानी संकटावर उपाययोजना करण्याकामी सरकारमधील तीन प्रमुख घटक पक्षात समन्वय व एकवाक्यता नाही.त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था ” भीक नको,पण कुत्रं आवर,” अशी झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हे या अस्मानी संकटाकडे इव्हेंटच्या दृष्टिकोनातून पाहतात,ही बाब दुःखदायक आहे.राजाने जर ताळतंत्र सोडले तर रयतेने कोणाकडे बघायचे ? अशी अभूतपूर्व…
