Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” देवाभाऊंना केवळ चिंता आहे, ” पुन्हा पुन्हा परत येण्याची,” मुंबई व ठाणे ही दोन शहरे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आता सुरक्षित राहिलेली नाही. काल अभिनेता टायगर श्रॉफवर झालेला हल्ला, हा देवा भाऊच्या गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगणारी आहेत. १९८० ते १९९० च्या दरम्यान या मुंबई शहराने प्रचंड रक्तपात पाहिला. गुंडानी एकमेकांच्या टोळीचे अनेक गुंड किड्या मुंग्यासारखी मारली. अखेर तत्कालीन आयुक्त ज्यूलिओ रिबेरो यांनी एन्काउंटरचे अस्त्र उपसले व टोळीयुद्धाचा अस्त झाला. पोलिसांनी शहरातील टोळीयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी अनेक गुंडाना टिपून मारले व मुंबई शांत झाली. पण आता या देवा भाऊच्या सरकारच्या काळात गुंडगिरी व दहशतीने पुन्हा डोके वर काढले आहे.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पाच तालुक्यातील शेतकरी फायद्यापासून वंचित, पंधरा दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाचा दौरा करून राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी, या तीन तालुक्याचाही समावेश आहे. उर्वरित वसई, पालघर, डहाणू, वाडा व विक्रमगड हे पाच तालुके त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे वसई वगळता इतर चार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर आले होते. त्यांनी या पाच तालुक्यात भीषण परिस्थिती असल्याचे सांगून या तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार…

Read More

दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय, परतीच्या पावसानेही दगा दिला ; रब्बी हंगाम धोक्यात, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण उतरणीला लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कायम भितीच्या सावटाखाली असतात. अशी स्थिती असताना दरवर्षी ” परतीचा पाऊस,” मात्र दरवर्षी हमखास फटका देऊन जातो. यंदाही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत होती. पण घडलं भलतंच, परतीच्या पावसानेही ठेंगा दाखवला.त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडी रखडल्या आहेत. यंदा देशात नैऋत्य मान्सून १२.६ % कमी झाला. २०१५ नंतरचा सर्वात कमी आणि २००१ नंतरचा चौथा सर्वात कमी मान्सून ठरला आहे. त्यामुळे राज्याच्या २६५ तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. वास्तविक ” परतीचा पाऊस,”…

Read More

दिपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” आर्थिक व धार्मिक अराजक निर्माण होणे,म्हणजे राज्याच्या विकासाची गती खुंटणे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात जे काही घडत आहे, ते केवळ निंदनीय नाहीच तर लांच्छनास्पद असेच आहे.सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्र,अशी ओळख असलेल्या राज्यात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत.समाज विस्कळीत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत,पण सरकार कारवाई करण्याऐवजी उघड्या डोळ्याने पाहत आहे. पैश्याची जी उधळपट्टी होत आहे, त्यामुळे आपले राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे.यामागे कोणत्या शक्ती आहेत,यावर कठोर उपाययोजना न झाल्यास राज्याचे काही खरं नाही.ही स्थिती कायम राहिल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील व राज्यातील उद्योगधंद्याचे इतर राज्यात पलायन सुरू होईल.त्यामुळे सरकारने वेळीच कठोर पावले उचलायला…

Read More

दीपक मोहिते, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या एका वक्तव्याने देशभरात तीव्र पडसाद, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा आणि निवडणूक आयोगाने राबवलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी, डाव्या संघट ना आणि विरोधकांचे देशभरात सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलन रोखण्यासाठी सरकारने दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यानिमित्ताने १५ ऑक्टो. रोजी दिल्ली प्रेस क्लब येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये अभिजीत दिपके, नेहा बोरा, अभिनेते प्रकाश राज यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या पत्रकार परिषदेमध्ये प्रशांत भूषण यांनी हे आंदोलन ” सत्ता उलथवून,” लावण्यासाठी असल्याचे…

Read More

दीपक मोहिते, दहशतवादी पन्नूला सतावतेय स्वतःच्या हत्येची भिती, गुरपतवंत सिंग पन्नू हा पंजाब राज्याला भारतापासून वेगळे करून खलिस्तान देश बनवण्यासाठी कॅनडामध्ये राहून कारवाया करत असतो.त्याची ” शीख फॉर जस्टीस,” ही संघटना अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. उद्या १८ ऑक्टो. रोजी त्याची दहशतवादी संघटना कॅनडाच्या एडमंटन येथे जनमत चाचणीचे आयोजन करत आहे.या जनमत चाचणीत भारताच्या पंजाब राज्याला स्वतंत्र देश घोषित करून, त्याचे नांव बदलून खलिस्तान करण्यात यावे का ? असा प्रश्न विचारण्यात येणार आहे.त्यासाठी या पन्नूने कॅनडातील शिखाना आमंत्रित केले आहे. पण काल त्याने आपली हत्या करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात असलेल्या आपल्या निवासस्थानी एफबीआयचे अधिकारी पोहोचले व…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” येत्या दसरा मेळाव्यात राज व उद्धव एकाच मंचावर, यंदाचा शिवसेना ( उबाठा गटाचा हिरक महोत्सवी ( ६० वा ) दसरा मेळावा मंगळ. २० ऑक्टो. रोजी सांयकाळी ५.०० वाजता शिवाजी पार्क,दादर येथे होणार आहे. दुसरीकडे त्याच सुमारास शिवसेनेचा ( शिंदे गट ) यांचा दसरा मेळावा नेस्को संकुल गोरेगाव येथे होत आहे.त्यांच्या या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार सायकली, २५ हजार शिलाई मशिन्स व आनंदाचा शिधा वाटप करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षांपासून उद्धव व राज हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. यंदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हे दोघे एकाच मंचावर पाहायला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मसाला उत्पादकांमध्ये कारवाईच्या भितीने घबराट, केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे अन्न व औषध विभाग व शिक्षण क्षेत्रातील बजबजपुरीवर कारवाईचा बडगा उचलण्यासंदर्भात कायम उदासीन राहिली. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे व कॉक्रोच जनता पार्टीचे नेते दोन महिन्यापूर्वी सक्रिय झाले व या विभागातील गैरप्रकार चव्हाट्यावर येऊ लागले. मुंडे यांनी मानवी जीवनाशी अघोरीं खेळ करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्याविरोधात मोहीम उघडल्यानंतर त्यांनी मसाल्याचे कारखाने / विक्री व्यवसाय करणाऱ्याकडे आता मोर्चा वळवला आहे. नागरी वसाहतीमधील अनधिकृत बांधकामात चालवण्यात येणारे कारखाने, उत्पादीत मालाचा हलक्या प्रतीचा दर्जा, कारखाना परिसरातील अस्वच्छता व आवाजाचे प्रदूषण याकडे प्रशासनाकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे मसाला उत्पादकामध्ये…

Read More

दीपक मोहिते, हल्लाबोल, टीआरपीच्या नादात बेताल वक्तव्ये ; माफी मागण्याची नामुष्की ओढवली, आपल्या पक्षाची भूमिका मांडणारे व पॉडकास्ट चालवणारे,अशा दोन प्रवक्त्यांना न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी सरन्यायधीश सूर्य कांत व न्या.जोयमाल्य यांच्या खंडपीठाने खा. संजय राऊत आणि पत्रकार निखिल वागळे या दोघांना ” तुमच्यावर फौजदारी अवमानाची कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली. ही नोटीस मिळाल्यानंतर बेताल वक्तव्ये करणाऱ्या या दोघांचे धाबे दणाणले व ते दोघे माफी मागून मोकळे झाले. टीआरपी मिळवण्याच्या नादात आपण कोणावर टीका करत आहोत, याचे भान या दोघांना राहीले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली. या प्रकरणी न्यायालयाने ” जेंव्हा यांचे स्वातंत्र्य धोक्यात येते, तेंव्हा हेच…

Read More

दीपक मोहिते, इन्फ्लुएन्सर्स आणि युट्युबर्ससाठी आचारसंहिता लागू करण्याचा प्रश्न विचाराधीन ? सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मान्यताप्राप्त पत्रकार, माध्यम संस्थांमध्ये काम करणारे, स्वतंत्र पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्यातील फरकाचा मुद्दा नुकताच उपस्थित केला आहे. जंतर मंतरवर झालेल्या सीजेपी आंदोलनावेळी एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आंदोलनावेळी जगभरात बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आजच्या डिजिटल युगात मोबाइल फोन आणि सोशल मीडियाने सर्वसामान्यांना घटनेची माहिती जगापर्यंत पोहचवणं अगदी सोपं केले आहे. परंतु जेव्हा स्वतंत्र पत्रकार, डिजिटल कन्टेंट बनवणारे आणि मान्यता प्राप्त मिडिया संस्थेचे रिपोर्टर कुठल्याही आंदोलनस्थळी रिपोर्टिंग करायला जातात, तेव्हा त्यांचे अधिकार आणि ओळखीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. याच मुद्द्यावर काल सर्वोच्च न्यायालयात…

Read More