दीपक मोहिते,
दहशतवादी पन्नूला सतावतेय स्वतःच्या हत्येची भिती,
गुरपतवंत सिंग पन्नू हा पंजाब राज्याला भारतापासून वेगळे करून खलिस्तान देश बनवण्यासाठी कॅनडामध्ये राहून कारवाया करत असतो.त्याची ” शीख फॉर जस्टीस,” ही संघटना अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. उद्या १८ ऑक्टो. रोजी त्याची दहशतवादी संघटना कॅनडाच्या एडमंटन येथे जनमत चाचणीचे आयोजन करत आहे.या जनमत चाचणीत भारताच्या पंजाब राज्याला स्वतंत्र देश घोषित करून, त्याचे नांव बदलून खलिस्तान करण्यात यावे का ? असा प्रश्न विचारण्यात येणार आहे.त्यासाठी या पन्नूने कॅनडातील शिखाना आमंत्रित केले आहे.
पण काल त्याने आपली हत्या करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात असलेल्या आपल्या निवासस्थानी एफबीआयचे अधिकारी पोहोचले व त्यांनी आपली हत्या होणार असल्याचे सांगितले असा दावा केला.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅनडा दौरा होत असताना त्यांनी हा आरोप केल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.आपल्या हत्येच्या शक्यतेची माहिती उघड करताना पन्नू पुढे म्हणतो, की, हत्येच्या कटापासून मी वाचणार की नाही, हा प्रश्न नाही तर शिखाच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराला जीवे मारण्याच्या धमक्याद्वारा रोखले जाऊ शकते का ? हा खरा प्रश्न आहे.या प्रकरणी एफबीआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.२०२३ साली अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. पण तो अयशस्वी ठरला होता. याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता व भारतीय गुप्तचर तंत्रणेचा माजी अधिकारी विकास यादव या दोघांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.गुप्ता हे सध्या अमेरिकेच्या तुरुंगात स्थानबद्ध आहेत. तर विकास यादव यांनी गेल्या फेब्रु. महिन्यात स्वतःवरील आरोप मान्य केले होते.
गुरपतवंत सिंग याचा १९६७ साली अमृतसरच्या खनकोट गावात झाला, त्याचे वडील सरकारी कर्मचारी होते. पंजाब महाविद्यालयातून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले व तो १९९२ मध्ये तो अमेरिकेत पळाला व त्याने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. २००७ मध्ये त्याने ” जस्टीस फॉर शीख,” संघटना स्थापन केली. मानवाधिकार असे या संघटनेचे स्वरूप असले तरी भारतापासून पंजाबला तोडून खलिस्तान बनवणे, असा त्याचा छुपा अजेंडा आहे. २०१९ मध्ये भारत सरकारने युपा कायद्याखाली त्याच्या ” जस्टीस फॉर शीख,” या संघटनेवर बंदी घातली.त्याच्या देशविरोधी कारवाया पाहून जुलै २०२० मध्ये त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले. त्याच्यावर पंजाब राज्यात २२ गुन्हे, त्यामध्ये ३ देशद्रोहाचे, व्हिडियो प्रसारित करून म्हणायचा, ” लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा लावा, लावणाऱ्याला १ लाख डॉलर्स देईन,” २०२३ मध्ये वर्ल्डकप फायनलच्या दिवशी त्याने एअर इंडिया बंद करा, अन्यथा हल्ला करू,असे धमकावले होते.कॅनडातील हिंदूंना ” भारतात परत जा,” असे सतत धमकावत असे. त्यामुळे केंद्र सरकारने त्याची पंजाबमधील जमीन जप्त केली.
या पन्नूचा हरदीपसिंग निज्जर नावाचा एक जिवलग मित्र होता. तो जून २०२३ मध्ये कॅनडामध्ये मारला गेला. त्यावेळी कॅनडा सरकारने भारतावर थेट आरोप केले होते, पण भारत सरकारने ते सर्व आरोप फेटाळून लावले. त्याचवेळी म्हणजे नोव्हे. २०२३ मध्ये अमेरिकेत पन्नूच्या हत्येचा कट रचला गेला. त्यासाठी दोन भारतीयांनी सुपारी दिली होती. या सर्व घडामोडीनंतर एफबीआय या अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याच्या घरी गेले व त्याला म्हणाले, ” तुझ्या जीवाला धोका आहे, तू कॅनडाला जाऊ नकोस.” जो दहशतवादी भारताला सतत धमक्या देतो, देशविरोधात कारवाया करतो, त्याच्या रक्षणासाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा काम करते, यावरून अमेरिकेचे दुटप्पी धोरण स्पष्ट झाले आहे.

