दीपक मोहिते,
माधव भंडारी : शब्दाने लढणारा भाजपचा शिलेदार,
जन्म : २१ ऑक्टो.१९५४, देवगड तालुका, सिंधुदुर्ग. कोकणच्या मातीतला हा नेता.
प्रवास रा. स्व. सं.पासून भाजपपर्यंत, लहानपणापासून रा. स्व. सं. मध्ये स्वयंसेवक, नंतर अभाविपमध्ये काम.
१९७५ च्या आणीबाणीच्या काळात पत्रकारितेत आले. मुंबईच्या ‘विवेक,’ साप्ताहिकाचे सहसंपादक,” म्हणून काम केलं.
१९८० मध्ये भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. कोकण विभागाचे संघटन मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अशी पदे भूषवली.१९९७-२००१ – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष, २००८ ते २०१४ संपूआच्या या काळात जेव्हा भाजप विरोधात होता, तेव्हा माधव भंडारी हेच टीव्हीवर भाजपचा चेहरा होते.अत्यंत अभ्यासू, शांत, पण टोकदार युक्तिवादाने ते विरोधकांना उत्तर देत असत. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं,” रा.स्व.सं आणि भाजप पूर्णपणे वेगळे आहेत. रा. स्व. सं.माणसे घडवते, भाजप सत्ता घडवते. रा.स्व.सं. जास्त लवचिक आणि स्विकारणारा आहे.” ५० वर्ष भाजपसाठी काम करूनही त्यांना कधीही विधानपरिषद किंवा मोठं राजकीय पद मिळालं नाही, त्याबद्दल अनेकदा चर्चा झाल्या. बाहेरून आलेल्यांना लगेच पदं मिळतात, पण निष्ठावंत कार्यकर्ता दुर्लक्षित राहतो, असं बोललं जातं. आजच्या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! कोकणचा हा सुसंस्कृत नेता आजही पक्षासाठी वैचारिक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.

