दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मसाला उत्पादकांमध्ये कारवाईच्या भितीने घबराट,
केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे अन्न व औषध विभाग व शिक्षण क्षेत्रातील बजबजपुरीवर कारवाईचा बडगा उचलण्यासंदर्भात कायम उदासीन राहिली. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे व कॉक्रोच जनता पार्टीचे नेते दोन महिन्यापूर्वी सक्रिय झाले व या विभागातील गैरप्रकार चव्हाट्यावर येऊ लागले. मुंडे यांनी मानवी जीवनाशी अघोरीं खेळ करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्याविरोधात मोहीम उघडल्यानंतर त्यांनी मसाल्याचे कारखाने / विक्री व्यवसाय करणाऱ्याकडे आता मोर्चा वळवला आहे. नागरी वसाहतीमधील अनधिकृत बांधकामात चालवण्यात येणारे कारखाने, उत्पादीत मालाचा हलक्या प्रतीचा दर्जा, कारखाना परिसरातील अस्वच्छता व आवाजाचे प्रदूषण याकडे प्रशासनाकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे मसाला उत्पादकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आयुक्त मुंडे यांच्या या निर्णयाचे राज्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
दुसरीकडे एमपीएससी तर्फे मार्च २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचे पेपर फुटले होते. याप्रकरणी एमपीएससीच्या काही अधिकाऱ्यांना अटकही झाली होती. त्यानंतर पुण्यात तब्बल अकरा दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे एमपीएससी चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले.या आंदोलना दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात जाऊन विद्यार्थ्याशी चर्चा केल्यानंतर ११ ऑक्टो. रोजी सरकारने विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. सरकारने आता या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद निवृत्त न्या.दिलीप भोसले यांच्याकडे सोपवले आहे. या समितीमध्ये एकूण पाच सदस्य आहेत.या समितीला ६० दिवसात आपला अहवाल द्यायचा आहे.या समितीमध्ये तुकाराम मुंडे हे सचिव पदाची धुरा सांभाळणार आहेत.
दरम्यान पनीर, दूध, मसाल्याच्या पदार्थात भेसळ करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. यासर्व घडामोडीनंतर काल आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन लवकरच मसाला उत्पादकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे मसाला उत्पादक भितीच्या सावटाखाली आले आहेत.

