Author: दीपक मोहिते

संदीप जाधव,बोईसर, बोईसर येथे तलाठ्याला धक्काबुक्की : तीन ट्रक ताब्यात, बोईसर पूर्व भागात अनेक दगडखाणी आणि क्रशर उद्योग करण्यात येतात.त्यामुळे या परिसरात जडवाहनाची सतत येजा सुरु असते.अत्यंत बेदरकारपणे धावणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी मौजे गुंदले सजाचे तलाठी हितेश राऊत यांनी पुढाकार घेतला व कारवाईचा बडगा उचलला. तलाठी हितेश राऊत यांनी अनधिकृत दगड वाहतुकीवर कारवाई सुरू केली. दरम्यान,एका वाहन मालकाने त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तलाठी राऊत यांनी पोलिसांच्या मदतीने अनधिकृत दगड वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी अशा घटना त्वरित रोखण्यात याव्यात ,अशी मागणी केली आहे.बोईसर पूर्व भागात जवळपास वीस ते पंचवीस अनधिकृत दगडखाणी…

Read More

संदीप लहांगे,डहाणू, पालघर येथे कोस्टल रिसिलियन्स’ व जलवायू बदलावर चर्चासत्र संपन्न, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ” कोस्टल रिसिलियन्स आणि स्ट्रेंथनिंग डिझास्टर अँड क्लायमेट चेंज अडक्शन इन पालघर डिस्ट्रिक्ट,” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमास पालघरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंडसइंड बँकच्या सीएसआर इनिशिटिव्ह अंतर्गत संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या कोस्टल रिस्क रिडक्शन,या उपक्रमाला पाठिंबा देत,या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात पालघर व डहाणू तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक नागरिक सहभागी उपस्थित होते.यामध्ये ग्रामविकास अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी,प्राध्यापक आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी…

Read More

दीपक मोहिते, ” भयाण वास्तव, ” देशातील पंधरा कोटी असंघटित कामगारांना मिळायला हवा, जगभरातील अनेक देशात कामगार क्षेत्र,हे संघटित व असंघटित,अशा दोन भागात विभागले आहे.आपल्या देशात असंघटित कामगाराची संख्या ही संघटीत कामगारापेक्षा अनेक पटीने जास्त आहे.संघटित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अटी,शर्ती मान्य केल्या आहेत,कामाची हमी दिली जाते.मासिक वेतन,वार्षिक बोनस,भविष्य निर्वाह निधी,इ.कायदे लागू केले जातात,ते क्षेत्र संघटित क्षेत्र म्हणून ओळखले जाते.तर असंघटित क्षेत्र,हे ज्याची सरकार दरबारी नोंद नाही,रोजगाराची हमी नाही,सरकारी कायदे व नियम लागू होत नाही व कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात,ते क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र होय. अशा या असंघटित क्षेत्रात आजमितीस कोट्यवधी कामगार,आपले हलाखीचे जीवन जगत आहेत.संघटित कामगारांच्या हिताचे अनेक…

Read More

दिपक मोहिते, ” दृष्टिक्षेप,” २०२४ साल ; कटू व गोड घडामोडीचे.. २०२४ साल संपायला आता केवळ ११ दिवस शिल्लक आहेत.पण आतापासूनच नववर्षाचे स्वागत करण्याची जय्यत तयारी नागरिकांनी चालवली आहे.नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आपण जोपासत आलो आहोत.वास्तविक हिंदू चालीरीती व संस्कृतीनुसार आपले नववर्ष हे चैत्र महिन्यास सुरू होते.पण जगभरातील देशात ते १ जाने.पासून सुरू होते आणि ही प्रथा आता आपल्या देशातही रूढ झाली आहे.३१ डिसें.रोजी मध्यरात्री १२.०० वाजता सरत्या वर्षाला बाय,बाय व १२.०१ मिनिटाने नववर्षाचे स्वागत,असा हा सोहळा असतो आणि तो आपण मोठ्या आनंदात साजरा करत असतो. गतवर्षाच्या कडू आठवणीना बाजूला सारत या दिवशी आपण विविध उपक्रम राबवत…

Read More

अनिल वैद्य,नाशिक, नाशिक येथे राज्य सबज्युनियर आर्चरी स्पर्धा : ६०० धनुर्धारांचा सहभाग, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे येत्या २१ ते २३ डिसें.दरम्यान नाशिकमध्ये सब ज्युनियर वयोगटातील मुले व मुलींच्या २३ व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धनुर्धरांचा सहभागी होणार आहेत.या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा थरार नाशिककरांना अनुभवयास मिळणार आहे,अशी माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,सेवक संचालक सी.डी.शिंदे, शिक्षणाधिकारी प्रा.डॉ. भास्कर ढोके,नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या सचिव मंगल शिंदे,खजिनदार संजय होळकर उपस्थित होते. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धा इंडियन राउंड,रिकर्व्ह…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाडा नगरपंचायतीच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या दोन वर्षापासून धुळ खात पडून, वाडा नगरपंचायतीचा गलथान कारभार सुरू असून कच-याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणा-या दोन गाड्या व दोन टैक्टर धुळ खात पडून असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वाडा शहरातील कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी वाहने खरेदी करण्यात आली होती.यातील दोन टॅक्टर आणि दोन छोटा हत्ती,ही चार वाहने धूळ खात पडली आहेत.ही चारही वाहने एका अडगळीच्या जागेत पाहायला मिळत आहेत.नवीन वाहने असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दरम्यान,या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी वाडा शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज…

Read More

जव्हार प्रतिनिधी, बालविवाह रोखण्यासाठी कासटवाडी ग्रामपंचायतीतर्फे ठराव मंजूर, ग्रामीण भागात बालविवाह आणि कमी वयात लग्न होण्याच्या घटनांमुळे वाढणाऱ्या कुपोषणाची समस्या सतत वाढत आहे. तसेच माता-बाळ मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कासटवाडी ग्रामपंचायतीने एक महत्त्वाचा ठराव केला आहे. या ठरावानुसार, ग्रामपंचायत क्षेत्रात कमी वयात साखरपुडा आणि लग्न करण्यास बंदी करण्यात आली आहे.याविषयीचा ठराव विशेष ग्रामसभेत मांडण्यात आला, ज्यामध्ये कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.सरपंच कल्पेश राऊत यावेळी म्हणाले, ” बालविवाहामुळे मुलांचे जीवनमान,आरोग्य आणि शिक्षणावर गंभीर परिणाम होतो.कमी वयातील मातांच्या गरोदरपणामुळे कुपोषण व आरोग्याच्या समस्या उद्भवतात.ज्यामुळे अनेकदा माता व बाळाचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण होतो. हे…

Read More

वसंत भोईर, वाडा, हिवाळ्यात पेरू खाण्याचे फायदे ठाऊक आहेत का ? चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने त्या त्या हंगामात पीकणारी फळे खायलाच हवी. सध्या पेरूचा हंगाम सुरू आहे शिवाय थंडीही चांगली पडू लागली आहे.थंडीत पेरू खाणे फायद्याचे असते,असे आहार तज्ञ सांगतात.पेरूतील जीवनसत्व क आणि इतर पौष्टिक घटकांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीर सदृढ व मजबूत होते.पेरूपाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करतो. पेरूच्या दोन जाती आहेत,एका जातीमध्ये पांढरा, दुसऱ्या जातीमध्ये गुलाबी गर असतो.सध्या थायलंड,तैवान या विदेशी सह देशी वाणांच्या पेरूचे उत्पादन विक्रमी होत असल्याने बाजारपेठेत आवक वाढली आहे.पाऊस लांबल्याने अजूनही जमिनीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पेरू तही पाणी जास्त आहे.त्यामुळे…

Read More

वसंत भोईर,वाडा, ग्रंथदिंडीचे स्वागत व विकास कामांचे भूमिपूजन. विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट शाखा अघई – मोहीली यांच्या वतीने प्रस्तावित असलेली ग्रंथदिंडीचे आयोजन व वृक्षारोपण इ. कार्यक्रम राबवण्यात आले.तसेच सफाई मोहिमेंतर्गत आजच्या दिंडीच्या प्रवासात त्यांनी अबिटघर गावाला भेट देऊन जनजागृती केली.यावेळी ग्रामपंचायत आबिटघरतर्फे सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीचे जल्लोषपूर्ण वातावरणात यथोचित स्वागत करण्यात आले. साठेपाडा येथे महायुतीचे आ.दौलत दरोडा यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.साठेपाडा मुख्य रस्ता ते पाण्याच्या हौदाकडे जाणारा रस्ता,हा संपूर्णपणे सिमेंट काँक्रिटचा होणार असून त्याची प्रस्तावित अंदाजपत्रकिय किंमत,ही लाखो रु.च्या घरात आहे. या प्रसंगी वाडा पंचायत समितीचे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सत्तेत आलात,आता जिल्ह्याची विकासकामे जलदगतीने मार्गी लावा.. वसई,नालासोपारा व बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा पराभव होऊन महायुतीची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.तसेच महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून जून २०२० पासून सलग चार वर्षे सरकार कारभार चालवत आहे.स्वतःकडे सत्ता असूनही महायुती व अन्य काही पक्षाचे स्थानिक नेते मात्र महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराबद्दल आ.हितेंद्र ठाकूर याना दोषी ठरवत होते. वास्तविक पालकमंत्री, खासदार,पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाचे आमदार हे सारे सत्ताधारी पक्षाचे आहेत.तरीही त्यांच्या नजरेत केवळ आ.हितेंद्र ठाकूर दोषी… आता नव्याने निवडून आलेले आमदारही त्यांच्याच पक्षाचे आहेत.त्यांच्या कार्यकालात विकासकामाना गती न मिळाल्यास लोकांनी या मंडळींना जबाबदार धरायला हवे.नवनिर्वाचित आमदारांनी पाणी,इस्पितळ,अनधिकृत…

Read More