संदीप जाधव,बोईसर,
बोईसर येथे तलाठ्याला धक्काबुक्की : तीन ट्रक ताब्यात,
बोईसर पूर्व भागात अनेक दगडखाणी आणि क्रशर उद्योग करण्यात येतात.त्यामुळे या परिसरात जडवाहनाची सतत येजा सुरु असते.अत्यंत बेदरकारपणे धावणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी मौजे गुंदले सजाचे तलाठी हितेश राऊत यांनी पुढाकार घेतला व कारवाईचा बडगा उचलला.
तलाठी हितेश राऊत यांनी अनधिकृत दगड वाहतुकीवर कारवाई सुरू केली. दरम्यान,एका वाहन मालकाने त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तलाठी राऊत यांनी
पोलिसांच्या मदतीने अनधिकृत दगड वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
दरम्यान स्थानिक नागरिकांनी अशा घटना त्वरित रोखण्यात याव्यात ,अशी मागणी केली आहे.बोईसर पूर्व भागात जवळपास वीस ते पंचवीस अनधिकृत दगडखाणी सुरु आहेत.दगड वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनामागे ठरविक हप्ता महसूल अधिकाऱ्यांना दिला जातो.त्यामुळे अनधिकृत व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.तसेच या क्रशरच्या माध्यमातून दगडापासून खडी उत्पादन करताना बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे या भागात मोठ्याप्रमाणात हवेतील प्रदूषण वाढले आहे.लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो.पण महसूल अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असतात.त्यामुळे या दगडखाणीचे वाहनचालक असे धाडस करू लागले आहेत.

