वसंत भोईर,
वाडा,
हिवाळ्यात पेरू खाण्याचे
फायदे ठाऊक आहेत का ?
चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने त्या त्या हंगामात पीकणारी फळे खायलाच हवी. सध्या पेरूचा हंगाम सुरू आहे शिवाय थंडीही चांगली पडू लागली आहे.थंडीत पेरू खाणे फायद्याचे असते,असे आहार तज्ञ सांगतात.पेरूतील जीवनसत्व क आणि इतर पौष्टिक घटकांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीर सदृढ व मजबूत होते.पेरूपाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करतो.
पेरूच्या दोन जाती आहेत,एका जातीमध्ये पांढरा, दुसऱ्या जातीमध्ये गुलाबी गर असतो.सध्या थायलंड,तैवान या विदेशी सह देशी वाणांच्या पेरूचे उत्पादन विक्रमी होत असल्याने बाजारपेठेत आवक वाढली आहे.पाऊस लांबल्याने अजूनही जमिनीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पेरू तही पाणी जास्त आहे.त्यामुळे सध्या पेरूचा गोडवा कमी झाला आहे सध्या आवक अधिक आणि मागणी कमी,अशी स्थिती आहे.
पेरू १०० रु.त दोन किलो
यंदा पोषक वातावरण आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.तर गोडवा ही कमी असल्याने मागणीत घट झाल्याने १०० रु.त दोन किलो असा दर झाला आहे.
संत्र्यापेक्षा जास्त विटॅमिन सी मध्ये असते.
पेरू मध्ये क जीवनसत्व बरोबर विटॅमिन सी जीवनसत्व संत्र्यापेक्षाही जास्त असल्याने या दिवसात पेरू खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात.
भाजून खाल्ल्यास शोषण शक्ती सुधारते.
पेरू हे फळ औषधी आहे ते भाजून खाल्ल्यास शोषणशक्ती सुधारून मानसिक थकवा जाऊन ऊर्जा प्राप्त होते.
मधुमेहाच्या रुग्णासाठी पेरू हे उत्तम फळ आहे.
पेरू हा मधुमेहाच्या रुग्णासाठी गुणकारी असून थंडीत खाल्ल्यास मधुमेही रुग्णास त्याचा फायदा होतो.
पचनशक्ती वाढते व वजन उतरते.
थंडीमध्ये पेरू खाल्ला की माणसाची पचनशक्ती वाढते.वजन कमी करण्यासाठी तो मदत करतो. म्हणून सध्या खोबरा पेरू व तैवान पेरूला ग्राहकांची पसंती आहे.
थंडीत साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.पेरूमध्ये विटामिन सी व विटामिन ए, फोलेट हे पोषक घटक आढळतात. पेरू मध्ये क जीवनसत्व असल्याने त्वचेचे आरोग्य ही चांगले राहते.
-डाॅ.जयेश पाटील

