वसंत भोईर,वाडा,
वाडा नगरपंचायतीच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या दोन वर्षापासून धुळ खात पडून,
वाडा नगरपंचायतीचा गलथान कारभार सुरू असून कच-याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणा-या दोन गाड्या व दोन टैक्टर धुळ खात पडून असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाडा शहरातील कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी वाहने खरेदी करण्यात आली होती.यातील दोन टॅक्टर आणि दोन छोटा हत्ती,ही चार वाहने धूळ खात पडली आहेत.ही चारही वाहने एका अडगळीच्या जागेत पाहायला मिळत आहेत.नवीन वाहने असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
दरम्यान,या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी वाडा शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
यासंदर्भात वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्याशी संपर्क साधला असता चालकांची संख्या कमी असल्यामुळे गाड्या आदळून बदळून वापरण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

