वसंत भोईर,वाडा,
ग्रंथदिंडीचे स्वागत व विकास कामांचे भूमिपूजन.
विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट शाखा अघई – मोहीली यांच्या वतीने प्रस्तावित असलेली ग्रंथदिंडीचे आयोजन व वृक्षारोपण इ. कार्यक्रम राबवण्यात आले.तसेच सफाई मोहिमेंतर्गत आजच्या दिंडीच्या प्रवासात त्यांनी अबिटघर गावाला भेट देऊन जनजागृती केली.यावेळी ग्रामपंचायत आबिटघरतर्फे सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीचे जल्लोषपूर्ण वातावरणात यथोचित स्वागत करण्यात आले.
साठेपाडा येथे महायुतीचे आ.दौलत दरोडा यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.साठेपाडा मुख्य रस्ता ते पाण्याच्या हौदाकडे जाणारा रस्ता,हा संपूर्णपणे सिमेंट काँक्रिटचा होणार असून त्याची प्रस्तावित अंदाजपत्रकिय किंमत,ही लाखो रु.च्या घरात आहे.
या प्रसंगी वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगदीश पाटील,माजी सभापती श्घुनाथ माळी,आबिटघर सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया सुनील पाटील,सदस्य धनश्री पाटील,भरत जाधव,माजी सरपंच भागवत साठे,पेसा समिती अध्यक्ष सुनील बरफ ज्येष्ठ नागरिक शांताराम धनगरे ग्रामस्थ विश्वास पाटील,अंकिता साठे तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम संस्थेचे शिक्षक वृंद व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत कार्यालय अबिटघर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून ग्रंथदिंडीला पुढे मार्गस्थ केले.

