- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराला उत्साहात सुरुवात, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जव्हार राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराला आज नांगरमोडा (दत्तमंदिर) येथे उत्साहात सुरुवात झाली.शिबिराचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जव्हार पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर मानभाव,पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भरतकुमार महाले, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य सुरेश कोरडा, ग्रामपंचायत सदस्य रमेश जंगली,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर.मेश्राम,हे उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी किशोर मानभाव यांनी विद्यार्थ्यांना नीतिमूल्ये जपण्याचे आणि प्रामाणिक राहण्याचे महत्व पटवून दिले. तर डॉ.भरतकुमार महाले यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आरोग्य समस्या आणि चांगल्या आहाराचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.…
जव्हार प्रतिनिधी, डॉ.पंजाबराव देशमुख यांची शतकोत्तर रौप्य जयंती उत्साहात साजरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त “डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनकार्य व विचार” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. एस.आर.व्हंडे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण,समाजसुधारणा आणि कृषी क्रांतीतील योगदानाबाबत सखोल माहिती दिली.ते आपल्या भाषणात म्हणाले,डॉ.देशमुख यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली आणि विदर्भाचा शैक्षणिक विकास साधला.त्यांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांसाठी न्यायाचा मार्ग मोकळा केला. कृषी विद्यापीठाच्या संकल्पनेची मांडणी, कृषी प्रदर्शनांचे आयोजनआणि संशोधन…
वसंत भोईर,वाडा, वाड्यातील कोंढले-खैरे रस्त्याची दुरवस्था,ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा तालुक्यातील कोंढले-खैरे,या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून,या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणे कठीण झाले आहे.वाहनचालक आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करत आहेत.शासनाने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.या रस्त्याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाडा तालुक्यातील कोंढले – खैरे रस्ता हा ९ कि. मी.अंतराचा असून तो प्रचंड वर्दळीचा आहे.कोंढले विभागातील १५ ते २० गावपाड्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.या रस्त्याची सध्या चाळण झाली असून, गाव- पाड्यांतील नागरिकांना या रस्त्यातून जीवघेणा प्रवास…
दीपक मोहिते, ” आर्थिक दुरावस्था,” मोफत योजना ; आर्थिक घडी विस्कळीत करणाऱ्या, देशात कर्जमाफी,मोफत वीज अल्पदरात गॅस सिलिंडर,मोफत घरे व पैसे वाटप,या योजना भविष्यासाठी धोकादायक असून पायाभूत सुविधा व अन्य विकासकामावर विपरीत परिणाम करणाऱ्या ठरतील,असा इशारा रिझर्व्ह बँकेने राज्यांना दिला आहे.देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे निरीक्षण नोंदवले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी देशातील अनेक राज्य सरकारानी अनेक मोफत योजना सुरू केल्या आहेत.त्यामध्ये लाडकी बहीण योजना,मोफत वीज,मोफत घरे व कर्जमाफी,याचा समावेश आहे.सरकारच्या या कृतीवर रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली असून त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर जाहीर केलेल्या अहवालात या सर्व खर्चाचा परिणाम सामाजिक व आर्थिक विकासावर होऊन अनेक महत्वाच्या क्षेत्राचा विकासही…
वसंत भोईर,वाडा, वाड्यात तरूणीवर अत्याचार,तरुण अटकेत, तालुक्यातील कुडूस येथे परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला वाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी गाळाचा पाड्यातील जंगलात सायंकाळच्या सुमारास घडली.या घटनेनेब सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडूस येथे सदर तरूणी राहत असून ती परिचारिकेचे शिक्षण घेत आहे.तरूणीचे वडील तिला भेटण्यासाठी कुडूस येथे आले होते.तरूणीच्या गावातील तरूणही तेथे दुचाकीवरून आला होता.मी तुम्हाला घरी सोडतो,असे सांगुन त्यांनी दोघांना गाडीवर बसवले आणि त्यानंतर गावाच्या जवळपास नेल्यानंतर त्यांनी तरूणीच्या वडीलांना अर्धा रस्त्यावर सोडले. त्यांना शाॅटकट रस्त्याने घरी जाण्यास सांगितले व तरूणीला मोटारसायकलवर तो…
सुरेश काटे,तलासरी, अणवीर गावात चार बंधाऱ्याचे भूमिपूजन, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून तलासरी तालुक्यांतील अणवीर गावात गेल्या चार वर्षांपासून सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे.याच कामाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून संस्थेने पाणलोट विकासाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून तलासरी तालुक्यांतील अणवीर गावात गेल्या 4 वर्षांपासून सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. याच कामाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून संस्थेने पाणलोट विकासाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो,परंतु गावा – गावांमध्ये जलसंधारण यंत्रणा पुरेशी आणि मजबूत नसल्याने पाणीसाठा होत नाही.त्यामुळे पावसाळा…
नवीन पाटील,सफाळे, केळवेरोड येथे मोफत आरोग्य शिबिरा संपन्न, लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व ढवळे हाँस्पिटल पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यधाम केळवेरोड येथे आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परीसरातील शंभरहुन अधिक रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली व गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. याप्रसंगी संघाचे कार्यकारी विश्वस्त सुरेश वर्तक,विश्वस्त नमिता राऊत, संघाचे चिटणीस विविध पाटील, वैद्यकीय सल्लागार डॉ.भार्गव ठाकूर,डॉ.विलास सावे, विश्रामधाम समितीप्रमुख अशोक राऊत,ढवळे हाँस्पिटलचे डॉ.अभिजित त्यांची टीम व परीसरातील मान्यवर उपस्थित होते. आरोग्यधामचे कार्यवाह पंकज म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आरोग्यधामाच्या कार्याची माहीती दिली व समिती प्रमुख जितेंद्र राऊत यानी आरोग्य शिबिर यशस्वी…
सुनावणीस उपस्थित न राहिलेल्या अर्जदारांसाठी पुन्हा सुनावणी तारखा जाहीर, वसई विरार शहर महानगरपालिकेतील ५५ गावाच्या प्रकरणी अधिसूचनेनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुन्हा समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रू.रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार १४ ते दि.१४ मार्च या कालावधीमध्ये हरकती अर्जांवर जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे १६ ते २० डिसें.पर्यंत सुनावणी सुरु होती. सदर सुनावणीसाठी हरकती अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहणे कामी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ज्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहता आले नाही,त्यांच्यासाठी पुन्हा सुनावणी तारखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.सदर सुनावण्या जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे २३ ते २६ डिसें.दरम्यान कार्यालयीन…
संदीप लहांगे, डहाणू, अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश, पंचायत समिती सभागृह डहाणू येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रवींद्र शिंदे,यांनी गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी ( पंचायत ),विस्तार अधिकारी ( सांख्यिकी ), सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची समन्वय आढावा सभा घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रुपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा,आणि पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रवीण भावसार,गट विकास अधिकारी पल्लवी सास्ते,पंचायत समिती डहाणू, तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना सन २०१६-१७ ते २०२३-२४…
संजय लांडगे,वाडा, परभणी येथे घडलेल्या घटनेचा वाड्यात जाहीर निषेध, परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली होती.त्या घटनेच्या निषेधार्थ लढा देणारा भिमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी,या तरुणाचा पोलीसांच्या अमानुष मारहाणीत जेलमध्येच मृत्यू झालेला आहे.महायुती सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशानस यांनी सुडबुध्दीने भिमसैनिकाला अमानुषपणे मारहाण केली,या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला.ही घटना अतिशय निंदणीय आहे.ज्या पोलीसांनी मारहाणी केली आहे.त्या पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून निलंबीत करावे.अशा मागणीचे निवेदन संविधान सन्मान विचार मंच वाडा तालुक्याच्या वतीने देण्यात आले. वाडा तालुका संविधान सन्मान विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आज वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देऊन भिमसैनिकाच्या मृत्यूप्रकरणी एस.आय.टी.चौकशी करावी. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना…
