संजय लांडगे,वाडा,
परभणी येथे घडलेल्या घटनेचा वाड्यात जाहीर निषेध,
परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली होती.त्या घटनेच्या निषेधार्थ लढा देणारा भिमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी,या तरुणाचा पोलीसांच्या अमानुष मारहाणीत जेलमध्येच मृत्यू झालेला आहे.महायुती सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशानस यांनी सुडबुध्दीने भिमसैनिकाला अमानुषपणे मारहाण केली,या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला.ही घटना अतिशय निंदणीय आहे.ज्या पोलीसांनी मारहाणी केली आहे.त्या पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून निलंबीत करावे.अशा मागणीचे निवेदन संविधान सन्मान विचार मंच वाडा तालुक्याच्या वतीने देण्यात आले.
वाडा तालुका संविधान सन्मान विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आज वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देऊन भिमसैनिकाच्या मृत्यूप्रकरणी एस.आय.टी.चौकशी करावी. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहीजे.तसेच आंदोलनकारी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवर पोलीसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत,ते शासनाने त्वरीत मागे घ्यावेत. आणि अटकेमध्ये असलेल्या निरापराध आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना सोडून द्यावे. मयत सुर्यवंशीच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी,तसेच शासनाने सुर्यवंशी कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी व त्यांचे पुर्नवसन करावे,अशा मागण्या केल्या आहेत.तर परभणी शहरामध्ये ज्या हरामखोर इसमाने संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे.त्या इसमाचे भारत सरकारने नागरिकत्व रद्द करावे व त्यास कठोर शिक्षा व्हावी,या मागणीवर जोर दिला आहे.
याप्रसंगी रमेश भोईर,वसंत जाधव,नारायण जाधव,अनंता गायकवाड,स्वप्नील कातारे,रमेश थोरात,कुणाल वैराले,श्यामराव बागुल, कालावती जाधव,गीतांजली गायकवाड,महेंद्र पाटील,अशोक कातारे, सुरेश कांबळे,रमेश थूले,रितेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

