Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” इनसाईड स्टोरी,” नेपाळ येथे माओवाद्यांची बैठक ; घडामोडींची शहानिशा होणे आवश्यक … चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सनसनाटी दावा केला होता.ते म्हणाले,महाराष्ट्र राज्य विस्कळीत करण्यासाठी नेपाळ या आपल्या शेजारी असलेल्या देशात माओवाद्यांची एक बैठक झाली.या बैठकीस राज्यातील काही अर्बन नक्षलवादी उपस्थित होते.त्यांच्या या दाव्यात तथ्य असेल तर ती चिंतेची बाब आहे.त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याची सखोल चौकशी होणे,गरजेचे आहे. हा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्वाचे चार निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.ईव्हीएम मशीनच्या वापरा विरोधात एल्गार पुकारणे,मुस्लिम,दलित व ओबीसी संघटनाना रस्त्यावर उतरवून सरकारविरोधात वातावरण तयार करणे, सरकारविरोधात आरपारची लढाई उभी करणे व संविधान…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्ह्याचे दुःख संपणार तरी कधी ? पालघर जिल्ह्याला यंदाही मंत्रिपद न लाभल्यामुळे सलग चौथ्यांदा बाहेरचा पालकमंत्री लादला जाणार, हे आता निश्चित झाले आहे.त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव चर्चेत आहे. पालघर जिल्ह्याला प्रत्येक सरकारने कायम सावत्रपणाची वागणूक दिली.जिल्ह्याचा पालकमंत्री,हा त्याच जिल्ह्याचा मंत्री असावा,अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.कारण त्या मंत्र्याला जिल्ह्यातील समस्या,प्रश्न व लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींची कल्पना असते.पण गेल्या दहा वर्षात पालघर जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपद आले नाही.तत्कालीन आदिवासी विकासमंत्री कै.विष्णू सवरा यांनी काही काळ पालकमंत्री म्हणून काम पाहिले,त्यानंतर मालेगावचे दादा भुसे व ठाणे जिल्ह्याचे रविंद्र चव्हाण,हे दोघे पालकमंत्री झाले. कोरोना काळात पालकमंत्री दादा भुसे,हे क्वचितच पालघर…

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड,आलोंडा/तांबडमाळ येथे आंनदाश्रमचे भुमिपुजन, पूर्वीकाळी गुरुकुल पद्धतीने जे शिक्षण घेतले जात होते,त्याच धर्तीवर या आनंदाश्रमामध्ये शिक्षण देण्यात येणार आहे. आज या आनंदाश्रमचे भूमिपूजन पार पडले. या आनंदाश्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे व राष्ट्र स्वाभिमानाचे शिक्षण देऊन त्यांना सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचे गुरुकुल शिक्षण दिले जाणार आहे. ह. भ.प.हरिश्चंद्र कुवरा महाराज यांच्या संकल्पनेतून हे आनंदाश्रम उभे राहत आहे. या भूमिपूजन सोहळ्याला महंत बालयोगी गणेश दाजी उदासीन,आचार्य देवलिंग महादलिंग जंगम गुरुजी,महंत मोहनदास महाराज,ओलोक नाथ महाराज,भारतनंदजी सरस्वती महाराज,दादा महाराज कुवरा,बालकनाथ महाराज कावळे मठ लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सावरा आ.हरिश्चंद्र भोये आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More

जव्हार,प्रतिनिधी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, खरवंद गाव,तालुका जव्हार, येथील शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवड,सेंद्रिय कीड व्यवस्थापन, व काढणी पश्चात व्यवस्थापन,या विषयांवर नुकताच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तालुका कृषी विभाग,जव्हार व जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.हरभरा लागवड हा २०२४-२५ या राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानाचा एक महत्त्वाचा भाग असून, त्याची देखरेख तालुका कृषी विभागाकडून करण्यात येते. या उपक्रमांतर्गत २० शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते, कीड नियंत्रक आणि बहु-पोषक द्रव्ये पुरविण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान,सुनील महाला यांनी सेंद्रिय खतांचा वापर,जमिनीची पोषक पातळी राखणे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर,याविषयी माहिती दिली.त्यांनी हरभरा लागवडीसाठी वनस्पती-आधारित कीटकनाशकांचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना त्याचा…

Read More

संदीप जाधव,बोईसर, वनसंपदेचा विनाश, प्रशासनाचा ढिसाळ कारभार, पालघर तालुक्यातील किराट गावात वनविभागाच्या सीमेलगत सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकामांमुळे पर्यावरण,वन्यजीव आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरुंग स्फोट केले जात असून,निसर्गाचा ऱ्हास,भूकंपासारखे धक्के, आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेले दुष्परिणाम स्पष्ट दिसून येत आहेत.मात्र,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गैरप्रकाराला आळा घालण्याऐवजी तो वाढत चालला आहे. किराट गावातील अनेक घरांतील लोक स्फोटांमुळे होणाऱ्या भूकंपसदृश धक्क्यांमुळे भीतीच्या वातावरणात जगत आहेत.सततच्या स्फ़ोटामुळे त्यांच्या घरांमध्ये तडे जात आहेत.या अशा वातावरणामुळे त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही महसूल आणि वनविभाग या प्रकरणी डोळेझाक करत आहेत. स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार,…

Read More

वसंत भोईर,वाडा, २५ हजार रु.ची अपेक्षा व्यर्थ : नोंदणीसाठी उरले केवळ नऊ दिवस, दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रु.बोनस देण्याची घोषणा केली. याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रति हेक्‍टरी पंचवीस हजार रु.बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र वाढीव बोनसचे देण्यात।आलेले आश्वासन हवेत विरले. या अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फारशी चर्चा झाली नाही.शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बोनसच्या प्रश्नाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.धानउत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी धानाला बोनस जाहीर केला जातो.युती सरकारने वीस हजार रु.हेक्टरी बोनस जाहीर केला…

Read More

सुरेश काटे,तलासरी, तलासरी येथे तालुकास्तरीय अन्नप्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे आयोजन, तलासरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.‌या कार्यशाळेत विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कऱण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सध्या सुरु असलेले प्रक्रिया व नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज कार्यपद्धती, 35% अनुदान,10% स्व:हिस्सा,55% कर्ज याप्रमाणे 2.00 लाखांपर्यंत प्रकल्प तयार करणे,इ. विषयावर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वप्नील पष्टे यांनी केले.अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन करणे,प्रकल्प अहवाल तयार करून बॅक कर्ज प्रक्रिया करण्यासाठी अर्जदारास पुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे.अर्जदाराने कोटेशन, आधारकार्ड,बॅक पासबुक, लाईट बील,उद्योग ठिकाण पुरावा,पॅनकार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे व्हाटसअप केले तरी चालेल, अशी माहिती स्नेहल वाकडे यांनी दिली. असंघटित…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” छगन भुजबळ ” दे धक्का,” देण्याच्या तयारीत… मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर संतापलेल्या छगन भुजबळ यांनी आता महायुती सरकारला ” दे धक्का,” देण्याची तयारी चालवली आहे.सध्या ते ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत सतत बैठका घेत असून शरद पवार गटात सामील होणे किंवा स्वतःची ओबीसी संघटना उभी करणे,अशा दोन पर्यायावर विचार करत आहेत. या दोन पर्यायापैकी ओबीसी संघटना उभारून राजकारणात सक्रिय होण्याचे त्यांनी ठरवले तर ते महायुतीला फार मोठा धक्का ठरू शकतो.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने महायुतीला भरभरून मते दिली होती.ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये,यासाठी छगन भुजबळ यांनी एकाकी किल्ला लढवला होता.मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांना…

Read More

दीपक मोहिते, भयावह स्थिती, संतोष देशमुख हत्या ; त्यांची पत्नी व कन्येचा आक्रोश ” लाडक्या बहीण योजने,” ला छेद देऊन गेला… काल विधानसभा अधिवेशनाचे सूप वाजले.या अधिवेशनात किती काम झाले,याचा लेखाजोगा मांडण्याऐवजी सरकारची लक्तरे कशी वेशीला टांगली गेली,याचा लेखाजोगा मांडण्याची गरज आहे.हे अधिवेशन खऱ्या अर्थाने भाजपचे आ.सुरेश धस यांनी गाजवले.हे सरकार गुन्हेगारी जगताला कसे पाठीशी घालते,गुन्हेगाराना कसे संरक्षण देते,यावर त्यांनी आक्रमकपणे प्रकाशझोत टाकला.स्व.गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर गुन्हेगारी नाहीशी व्हावी,यासाठी खस्ता खाल्या.आज त्यांची विद्यमान पिढी गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचा थेट आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला.या अधिवेशनात एक भाजपचा आमदार आपल्या सरकारचे अपयश उजेडात आणत होता,यावेळी सत्ताधारी पक्षाचे मंत्री व आमदार हे…

Read More

दिपक मोहिते, आनंदाचा उत्सव, ” जिंगल बेल,जिंगल बेल,जिंगल ऑल द वे,” ची धून लवकरच ऐकायला मिळणार, २५ डिसें.रोजी साजरा होणाऱ्या नाताळ सणाचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.दरवर्षी देशभरात नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.गोव्यात या निमित्ताने अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात.येथे होणाऱ्या कार्नीव्हलचे विशेष आकर्षण असते,त्यासाठी या अनेक देशातील पर्यटक गोव्यात दाखल होत असतात.पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातही दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यात ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने राहतो.त्यामुळे येथे नाताळ उत्साहात साजरा होत असतो.नाताळ गोठा,ख्रिसमस ट्री,सांता क्लॉज,आकर्षक कंदील,रंगीबेरंगी आकर्षक पेहराव,केक व अन्य खाद्यपदार्थ,याचा त्यामध्ये समावेश असतो.नाताळ सणाच्या अगोदर मध्यरात्री चर्चेसमध्ये सामूहिक प्रार्थना…

Read More