संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड,आलोंडा/तांबडमाळ येथे आंनदाश्रमचे भुमिपुजन,
पूर्वीकाळी गुरुकुल पद्धतीने जे शिक्षण घेतले जात होते,त्याच धर्तीवर या आनंदाश्रमामध्ये शिक्षण देण्यात येणार आहे. आज या आनंदाश्रमचे भूमिपूजन पार पडले.
या आनंदाश्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे व राष्ट्र स्वाभिमानाचे शिक्षण देऊन त्यांना सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचे गुरुकुल शिक्षण दिले जाणार आहे. ह. भ.प.हरिश्चंद्र कुवरा महाराज यांच्या संकल्पनेतून हे आनंदाश्रम उभे राहत आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला महंत बालयोगी गणेश दाजी उदासीन,आचार्य देवलिंग महादलिंग जंगम गुरुजी,महंत मोहनदास महाराज,ओलोक नाथ महाराज,भारतनंदजी सरस्वती महाराज,दादा महाराज कुवरा,बालकनाथ महाराज कावळे मठ लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सावरा आ.हरिश्चंद्र भोये आदी मान्यवर उपस्थित होते.

