वसंत भोईर,वाडा,
२५ हजार रु.ची अपेक्षा व्यर्थ : नोंदणीसाठी उरले केवळ नऊ दिवस,
दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रु.बोनस देण्याची घोषणा केली. याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रति हेक्टरी पंचवीस हजार रु.बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र वाढीव बोनसचे देण्यात।आलेले आश्वासन हवेत विरले.
या अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फारशी चर्चा झाली नाही.शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बोनसच्या प्रश्नाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.धानउत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी धानाला बोनस जाहीर केला जातो.युती सरकारने वीस हजार रु.हेक्टरी बोनस जाहीर केला होता.
यंदा विधानसभा निवडणुकीदरम्यान धानाला एक तरी २५ हजार रु. बोनस देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.विधिमंडळ अधिवेशन दरम्यान धानाला बोनस जाहीर करण्याची प्रथा आहे.त्यामुळे अधिवेशनात धानाला बोनसची घोषणा होणार होईल,याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच रकमेच्या बोनसची घोषणा केल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
पूर्वी क्विंटल नुसार, आता हेक्टर नुसार बोनस…
धानाची शेती तोट्यात जात असताना शेतकऱ्यांकडून योग्य हमीभाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत शासनाने २०१५ – १६ पासून धानाच्या चौदाशे दहा रु.च्या हमीभावावर दोनशे रु. बोनस जाहीर केला. तेव्हापासून शेतकऱ्यांना धानावर बोनस मिळू लागला.२०१७ – १८ मध्ये पाचशे रु.बोनस जाहीर झाला. त्यानंतर २०१९ – २० पासून सातशे रु. प्रतिक्विंटल बोनस मिळण्यास सुरुवात झाली.२०२० – २१ पर्यंत बोनस क्विंटल नुसार मिळत होता. मात्र,त्यानंतर बोनस रकमेत वाढ करण्यात आली.सन २०२२ – २३ आणि २०२३ – २४,या दोन वर्षी अनुक्रमे १५ व २० हजार रु. प्रति क्विंटल बोनस मिळाला होता.

