सुरेश काटे,तलासरी,
तलासरी येथे तालुकास्तरीय अन्नप्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे
आयोजन,
तलासरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कऱण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये सध्या सुरु असलेले प्रक्रिया व नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज कार्यपद्धती, 35% अनुदान,10% स्व:हिस्सा,55% कर्ज याप्रमाणे 2.00 लाखांपर्यंत प्रकल्प तयार करणे,इ. विषयावर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वप्नील पष्टे यांनी केले.अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन करणे,प्रकल्प अहवाल तयार करून बॅक कर्ज प्रक्रिया करण्यासाठी अर्जदारास पुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे.अर्जदाराने कोटेशन, आधारकार्ड,बॅक पासबुक, लाईट बील,उद्योग ठिकाण पुरावा,पॅनकार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे व्हाटसअप केले तरी चालेल, अशी माहिती स्नेहल वाकडे यांनी दिली.
असंघटित असलेले लहान लहान उद्योग अनोंदणीकृत असल्यामुळे उद्योगाला चालना मिळत नाही.तसेच प्रक्रिया उद्योगासाठी गुणवत्ता अभाव, तंत्रज्ञान अभाव या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असते.यावर उपाय म्हणून सर्व बाबींचा समावेश होणे,आवश्यक आहे.प्रक्रिया उद्योग गुणवत्तायुक्त असणं आवश्यक असल्याने यांचे अल्प कालावधीचे प्रशिक्षण घेतले पाहिजे,अशी माहिती सुनिल बोरसे मंडळ कृषि अधिकारी यांनी दिली.
सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी सर्व बॅकेच्या प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असून कर्ज प्रक्रिया करण्यासाठी अर्जदारास काही अडचणी आल्यास पुर्णपणे सहकार्य करण्यात येणार आहे.तसेच पापड,उद्योग,चिकू अथवा इतर फळांच्या प्रक्रिया पदार्थ, दुधापासून तयार करण्यात येत असलेले पदार्थ,पॅकिंग महत्त्व, उपलब्ध बाजार याबाबतीत माहिती व्हावी,म्हणून तसेच आपल्या तालुक्यात या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे या तालुका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे राहुल गायकवाड कृषि अधिकारी यांनी सांगितले.
या कार्यक्रमात 2.0 एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांचे पाणलोट समिती सचिव व सरपंच हे उपस्थित होते. पाणलोट समिती,प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा व गटाचे अध्यक्ष व सचिव यांचा समन्वयाचा अभाव असल्याने पाणलोट समिती सचिव व सरपंच यांना समन्वयाचा अभाव या शंकेचे निराकरण करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये पन्नास शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

