दीपक मोहिते,
” इनसाईड स्टोरी,”
नेपाळ येथे माओवाद्यांची बैठक ; घडामोडींची शहानिशा होणे आवश्यक …
चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सनसनाटी दावा केला होता.ते म्हणाले,महाराष्ट्र राज्य विस्कळीत करण्यासाठी नेपाळ या आपल्या शेजारी असलेल्या देशात माओवाद्यांची एक बैठक झाली.या बैठकीस राज्यातील काही अर्बन नक्षलवादी उपस्थित होते.त्यांच्या या दाव्यात तथ्य असेल तर ती चिंतेची बाब आहे.त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याची सखोल चौकशी होणे,गरजेचे आहे.
हा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्वाचे चार निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.ईव्हीएम मशीनच्या वापरा विरोधात एल्गार पुकारणे,मुस्लिम,दलित व ओबीसी संघटनाना रस्त्यावर उतरवून सरकारविरोधात वातावरण तयार करणे, सरकारविरोधात आरपारची लढाई उभी करणे व संविधान धोक्यात असल्याची देशभरात आवई उठवणे,या विषयावर चर्चा झाल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये सहभागी झालेले अर्बन नक्षलवादी हे ” भारत जोडो,” यात्रेत सहभागी झाले होते,असा थेट आरोप केला आहे.या त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर ते केंद्रीय तपास यंत्रणांना हे एकप्रकारचे आव्हान असून त्यांनी त्वरित पावलं उचलण्याची गरज आहे.पण त्यांच्या या वक्तव्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल न घेतल्यामुळे फडणवीस यांच्या दाव्यात नसावे,असे वाटते.पण नेपाळ,पाकिस्तान,म्यानमार,श्रीलंका,मालदीव व बांगला देश या शेजारच्या देशात अमेरिका,चीन व रशिया,यांच्या सुरू असलेल्या कारवाया,लक्षात घेता,आपल्याला गाफील राहता येणार नाही.बांगला देशात हसीना शेख यांची सत्ता उलथवून टाकण्यात अमेरिकेचा हात होता,हे आता स्पष्ट झाले आहे. बांगला देशाच्या ढाका या राजधानीत असलेल्या अमेरिकन वकीलातीमधील एका महिला अधिकाऱ्याने हे बंड घडवून आणण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली होती.त्यामुळे या बैठकीच्या मागे कोणत्या परकीय शक्ती आहेत,हे शोधून काढणे,आवश्यक ठरते. या सर्व घडामोडींचा केंद्र सरकारच्या गुप्तहेर संस्थांनी पाठपुरावा व्हायला हवा.देशाची अखंडता व एकात्मतेला नख लावणाऱ्या शक्तीची नांगी ठेचणे,केंद्र सरकारचे प्रथम कर्तव्य ठरते.

