- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, सोमोजीत रॉय हा मिस्टर पर्सनॅलिटी,तर मोनालिसा वर्मा मिस पर्सनॅलिटी, ३५ व्या कला क्रीडा महोत्सवाचा कालचा दिवस मिस्टर और मिस पर्सनलिटी स्पर्धेने गाजला.या स्पर्ध्येत सोमोजीत रॉय मिस्टर पर्सनॅलिटी तर मोनालिसा वर्मा मिस पर्सनॅलिटी ठरली. वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवात सध्या वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळाडू आणि कलाकार आपले नशीब अजमावत आहे.काल रात्री चिमाजी आप्पा मैदानावर ग्रुप फॅशन शो भाणि मिस्टर व मिस पर्सनलिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रुप फॅशन शो स्पर्ध्येत विजेता ठरला तर हा ग्रोप उपविजेता ठरला.स्पर्ध्येचे आकर्षण असलेल्या मिस्टर आणि मिस पर्सनॅलिटी स्पर्ध्येत सोमोजीत रॉय विजेता ठरला तर वलरॉथ कदम आणि शुभम दळवी द्वितीय आणि तृतीय ठरले.या…
अनिल वैद्य,नाशिक, वाढवण बंदर देणार नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस, मुंबई लगत डहाणू – वाढवण समुद्रकिनारी होऊ घातलेले वाढवण बंदर उत्तर महाराष्ट्रासह नाशिकच्या आर्थिक विकासाला बूस्टर डोस देणारे ठरणार आहे.जिल्ह्यातील निर्यातदारांचा खर्च २५ टक्के कमी हाेणार असून,त्यातूुन तयार होणाऱ्या व्यवसायाच्या संधी साधत उद्योजकांनी या आर्थिक कुंभमेळ्यात सहभागी व्हावे,असे आवाहन जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ” वाढवण बंदर-एक व्यावसायिक संधी,” या विषयावर नुकताच उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर आयोजीत पत्रकार परीषदेत त्यांनी ही माहिती दिली.” मेक इन इंडिया, ” व ” आत्मनिर्भर भारत,” या संकल्पनांचा लाभ…
दीपक मोहिते, बांगलादेशी घुसखोरांचा वेळीच बंदोबस्त करा, बांगला देशात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत,त्याचा थेट परिणाम भारतावर जाणवू लागला आहे.शेख हसीना यांचे सरकार पदच्युत झाल्यानंतर त्या देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे.हजारो बांगला देशी नागरिक आपल्या सीमेवर जमा होत आहेत.त्यामुळे आपल्या सीमा सुरक्षा दलाने सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.असे असतानाही अनेक बांगलादेशी नागरिक आपल्या देशात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरत आहेत. या घडामोडीमुळे आपल्या सीमारेषेवर तैनात असलेली सुरक्षायंत्रणा ही प्रभावी नसल्याचे दिसून आले आहे.सीमाभागांमध्ये परकीय नागरिक पैसे देऊन घुसखोरी करत असतात.हे बांगलादेशी घुसखोर आपल्या देशात घुसखोरी करून वेगवेगळ्या राज्यात आपले बस्तान बसवतात. अशा या घुसखोरांना आपल्या देशात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कालच्या आक्रोश मोर्चाने महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली.. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयाची सुई धनंजय मुंडे यांच्या अवती भोवती फिरत असूनही त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार नाहीत.त्यामुळे त्यांच्या सरकारची प्रतिमा डागाळत चालली आहे.काल बीडमध्ये प्रचंड आक्रोश मोर्चा निघाल्यानंतर सरकारने फरार आरोपींची संपत्ती व हवेत गोळीबार करणाऱ्या गुंडांच्या रिव्हॉल्व्हरचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले.सरकारची ही कारवाई लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे,असे बीडवासीयांचे म्हणणे आहे.धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे व वाल्मिक कराड व त्यांच्या टोळीला जेरबंद करणे,अशा दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.त्या मागण्याची पूर्तता करण्यास फडणवीस सरकार सतत चालढकल करत आहे.त्यामुळे या…
राजेंद्र क्षीरसागर,बीड सरकारला उपरती, बीडच्या मोर्चानंतर फडणवीस सरकार खडबडून जागे झाले, फरार आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी, बीड येथे संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना अटक करावी,या मागणीसाठी आज बीड मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.यावेळी आ.सुरेश धस,आ.जितेंद्र आव्हाड,खा.बजरंग सोनावणे,आ.प्रकाश सोळखे,आ.संदीप क्षीरसागर,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील व छ.संभाजीराजे यांची भाषणे झाली.बीड जिल्ह्याच्या इतिहासात असा मोर्चा कधी निघाला नव्हता,असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी माध्यमांना सांगितले.या मोर्चानंतर फडणवीस सरकार खडबडून झाले व त्यांनी काही आदेश जारी केले आहेत. आज बीड शहरात या मोर्च्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला होता.यावेळी सर्वच वक्त्यांनी वाल्मिक कराड व अन्य दोघांना सरकारने…
वसंत भोईर,वाडा, वाड्यातील शेतकऱ्यांना हिरवी काकडीची लागवड ठरली लाभदायक, वाडा तालुक्यातील तरुणाईची पावले आता मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे वळू लागली आहेत.शेती हा व्यवसाय वडिलोपार्जित व्यवसाय असल्याचा अभिमान मनी बाळगून नरेश शंकर आमले या तरुणाने आपल्या स्वतःच्या २० गुंठे जागेत हिरवी काकडीची लागवड केली आहे.त्यासाठी त्याला ३० ते ३५ हजार रु.इतका खर्च आला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्याने काकडी लागवड या शेतकऱ्याला लाभदायक ठरली आहे.तालुक्यातील झाडखैरे येथील नरेश आमले यांनी ठिबक सिंचन,या आधुनिक पद्धतीने हिरवी काकडीची शेतीसाठी मजूरी खर्च कमी लागतो.तसेच खते,औषधे ठिबकद्वारे दिली जात असल्याने खर्चात बचत होत आहे.काकडी तयार झाल्यापासून १ दिवस आड तीची तोड केली जाते.…
सद्दाम शेख,मोखाडा, वेळीच उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टर व नर्सेसवर आरोप, पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.अतिग्रामीण भागातील भयानक वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.एका गरोदर मातेला प्रसूतीनंतर रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना मोखाड्यात घडली आहे.परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटूंबियाने केला आहे. मोखाडा तालुक्यापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या मोऱ्हांडा ग्रामपंचायतमधील कोलद्याचापाडा येथील गरोदर माता आशा नंदकुमार भुसारे, वय ( २२ वर्ष ) हीला प्रसूतीसाठी २५ डिसें.रोजी पहाटे ३.०० वाजता मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु यावेळी दिवसभर कोणताही उपचार न करता या महिलेला वैद्यकीय अधिकारी…
नदीम शेख, पालघर, तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेवा आश्रम विद्यालयाला पालघर तालुक्यात प्रथम क्रमांक, पालघर तालुक्यात आयोजित ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेवा आश्रम विद्यालय,बोईसरने उल्लेखनीय कामगिरी करत प्रयोगशाळा सहा.गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या ” साधा सूक्ष्मदर्शक,” या उपकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या यशस्वी प्रकल्पामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक पिंपळे रविंद्र अनंत सर आणि प्रयोगशाळा सहाय्यक रामदास महादेव शिंदे यांचे कठोर परिश्रम आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या जटिल संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेतल्या आणि हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला. या कामगिरीबद्दल सेवा आश्रम शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकानी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.या यशाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची…
वसंत भोईर,वाडा, भरत हजारे यांचा तालुक्याचे उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरव, खानिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भरत हजारे,हे निवडून आल्यापासून सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामपंचायतीचे नाव महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आणले आहे.गेल्या दोन वर्षापासून गावाचा शास्वत आणि पायाभूत विकास करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात.गेल्या दोन वर्षात गावात अनेक विकासकामे केली असून ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळवून दिला आहे.महाराष्ट्र शासनाच्या वातावरणीय व पर्यावरणीय बदल विभागाचे माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये खानिवली ग्रामपंचायतीला कोंकण विभागाचे ५० लाखाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.आता ग्रामपंचायत राज्यस्तरावर स्पर्धा करत आहे.ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीन असुन त्या माध्यमातून २ महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.गावातील तलावाचे अमृत सरोवरमध्ये…
वसंत भोईर,वाडा, बोर आहेत की ॲपल ? शेतकऱ्यांचा कल लागवडीकडे… एप्पल बोर,हे मूल थायलंड देशातील फळ पीक आहे. उत्तम पश्चिम बंगाल राज्यात ॲपल बोरचे उत्पादन घेण्यात आले.त्यानंतर देशभरात सर्व भागात या फळाचे पीक घेतले जात आहे. अधिक वजनदार आणि मगसदार असल्याने बोर चवीला गोड आणि तुरट आहे. मधुमेह असलेल्या नागरिकांसाठी ते आरोग्यदायी मानले जाते.दुष्काळी भागात कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून ॲपल बोर या पिकाकडे पाहिले जाते. एका झाडाला ३० ते ४० किलो बोरं लागतात.एक किलोमध्ये आठ ते दहा बोर असतात.इतकी वजनदार ही बोरे असतात.या बोरांची झाडे प्रचंड काटक असतात. वातावरणात या बोरांच्या झाडांची वाढ होते.३७ ते ४८ अंश…
