वसंत भोईर,वाडा,
बोर आहेत की ॲपल ? शेतकऱ्यांचा कल लागवडीकडे…
एप्पल बोर,हे मूल थायलंड देशातील फळ पीक आहे. उत्तम पश्चिम बंगाल राज्यात ॲपल बोरचे उत्पादन घेण्यात आले.त्यानंतर देशभरात सर्व भागात या फळाचे पीक घेतले जात आहे.
अधिक वजनदार आणि मगसदार असल्याने बोर चवीला गोड आणि तुरट आहे. मधुमेह असलेल्या नागरिकांसाठी ते आरोग्यदायी मानले जाते.दुष्काळी भागात कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून ॲपल बोर या पिकाकडे पाहिले जाते. एका झाडाला ३० ते ४० किलो बोरं लागतात.एक किलोमध्ये आठ ते दहा बोर असतात.इतकी वजनदार ही बोरे असतात.या बोरांची झाडे प्रचंड काटक असतात. वातावरणात या बोरांच्या झाडांची वाढ होते.३७ ते ४८ अंश सेल्सिअसमध्ये या झाडांची जोमाने वाढ होते. आग अथवा इतर कुठल्याही कारणाने झाडाचे नुकसान झाले तरी झाड पुन्हा जोमाने उभे राहते,ॲपल बोर वाळू मिश्रित दगडाच्या खडकाळ व निचरा होणाऱ्या जमिनीतील या झाडाची वाढ होते.हे पीक शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे आहे.
ॲपल बोर हे संकरित आणि निरोगी असे फळ आहे.त्यामुळे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहायला मिळतात.बाजारात या बोराला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ॲपल बोराची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
या बोरामध्ये कॅल्शियम,फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. पोषणाच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा ॲपल बोर श्रेष्ठ मानले जाते.यातील परिपक्व बोराचा औषधासाठी वापर केला जातो.
बाजारात ॲपल बोर मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.या बोराला ८० रु. किलो असा दर आहे.ही बोरे भरीव आणि मगजदार असल्याने बाजारात सर्वाधिक मागणी आहे.
बाजारात विक्रीसाठी आलेली ही बोरे हिरव्या रंगाची आहेत.त्याला सफरचंदासारखा आकार आहे,ग्रीन सफरचंदाप्रमाणे दिसणारे हे बोर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.यातील पौष्टिक गुणधर्म अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी मदतीचे ठरणारे आहेत.
बाजारात छोट्या आकाराची लालसर एप्पल बोर आहेत.हे सफरचंदासारखी दिसतात, परंतु आकाराने छोटी आहेत. याचा गोडवा चांगला असतो. त्यामुळे ही बोरे खरेदी केली जातात.आकर्षक रंगाने बाजारात या फळाला चांगली मागणी आहे.
बाजारात मागणीनुसार विविध फळांची उपलब्धता करून दिली जाते.हे दर ग्राहकांच्या आवाक्यात आल्याने बाजारात खरेदी होत आहे.
– शैलेश तिवारी, व्यवसायिक

