वसंत भोईर,वाडा,
भरत हजारे यांचा तालुक्याचे उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरव,
खानिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भरत हजारे,हे निवडून आल्यापासून सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामपंचायतीचे नाव महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आणले आहे.गेल्या दोन वर्षापासून गावाचा शास्वत आणि पायाभूत विकास करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात.गेल्या दोन वर्षात गावात अनेक विकासकामे केली असून ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळवून दिला आहे.महाराष्ट्र शासनाच्या वातावरणीय व पर्यावरणीय बदल विभागाचे माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये खानिवली ग्रामपंचायतीला कोंकण विभागाचे ५० लाखाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.आता ग्रामपंचायत राज्यस्तरावर स्पर्धा करत आहे.ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीन असुन त्या माध्यमातून २ महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.गावातील तलावाचे अमृत सरोवरमध्ये रूपांतर केले असुन अतिशय सुंदर आणि दिखामदार बनवले आहे.गावात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महिलांना दररोज रोजगार दिला जातो.भरत हजारे हे स्वतः यशदा पुणे या शासकीय संस्थेचे प्रविण प्रशिक्षक असुन त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरपंच यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते.पंचायत राज प्रशिक्षण संस्थेचेसुद्धा ते प्रशिक्षक आहेत.पेसा विषयाचे ते अभ्यासक असुन त्यांना पेसा कायद्याचा चांगला अभ्यास आहे.याची दखल घेऊन पंचायत समितीने यावर्षी पेसा दिनाच्या निमित्ताने सरपंच भरत हजारे यांना उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार देण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी वैभव शिंदे,विस्तार अधिकारी वसंत अहिरे,विस्तार अधिकारी नितिन मोकाशी,कृषि विस्तार अधिकारी गायकवाड,तालुका पेसा समन्वयक महेश भोईर,तालुक्यातील सरपंच,पेसा मोबिलायझर उपस्थित होते.

