नदीम शेख, पालघर,
तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेवा आश्रम विद्यालयाला पालघर तालुक्यात प्रथम क्रमांक,
पालघर तालुक्यात आयोजित ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेवा आश्रम विद्यालय,बोईसरने उल्लेखनीय कामगिरी करत प्रयोगशाळा सहा.गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या ” साधा सूक्ष्मदर्शक,” या उपकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या यशस्वी प्रकल्पामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक पिंपळे रविंद्र अनंत सर आणि प्रयोगशाळा सहाय्यक रामदास महादेव शिंदे यांचे कठोर परिश्रम आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या जटिल संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेतल्या आणि हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला.
या कामगिरीबद्दल सेवा आश्रम शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकानी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.या यशाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची कुतूहल वाढेल आणि ते भविष्यात शास्त्रज्ञ म्हणून देशाची सेवा करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

