वसंत भोईर,वाडा,
वाड्यातील शेतकऱ्यांना हिरवी काकडीची लागवड ठरली लाभदायक,
वाडा तालुक्यातील तरुणाईची पावले आता मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे वळू लागली आहेत.शेती हा व्यवसाय वडिलोपार्जित व्यवसाय असल्याचा अभिमान मनी बाळगून नरेश शंकर आमले या तरुणाने आपल्या स्वतःच्या २० गुंठे जागेत हिरवी काकडीची लागवड केली आहे.त्यासाठी त्याला ३० ते ३५ हजार रु.इतका खर्च आला आहे.
कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्याने काकडी लागवड या शेतकऱ्याला लाभदायक ठरली आहे.तालुक्यातील झाडखैरे येथील नरेश आमले यांनी ठिबक सिंचन,या आधुनिक पद्धतीने हिरवी काकडीची शेतीसाठी मजूरी खर्च कमी लागतो.तसेच खते,औषधे ठिबकद्वारे दिली जात असल्याने खर्चात बचत होत आहे.काकडी तयार झाल्यापासून १ दिवस आड तीची तोड केली जाते. दररोज एकुण १८ ते २० तोड होत असतात.तोड केलेली काकडी भिवंडी येथील बाजारपेठेत विक्री केली जाते.प्रति किलो २५ ते २८ रु.असा भाव मिळत असल्याचे शेतकरी नरेश आमले यांनी सांगीतले.
काकडी ही केवल उन्हाळ्यातच खावी,अशी भाजी नाही.कारण काकडी ही सर्वच ॠतुमध्ये उपलब्ध असते.
काकडीमध्ये संपूर्ण मानवी आरोग्यास चालना देण्यासाठी पुरेसे घटक आहेत.आपल्या रोजच्या आहारात तीचे सेवन करणे फायदेशीर आहे.काकडीत पौष्टिक गुणधर्म असल्याने निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वपुर्ण घटक असल्याने काकडीला सर्वच ऋतुमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते.

