दीपक मोहिते,
सोमोजीत रॉय हा मिस्टर पर्सनॅलिटी,तर मोनालिसा वर्मा मिस पर्सनॅलिटी,
- ३५ व्या कला क्रीडा महोत्सवाचा कालचा दिवस मिस्टर और मिस पर्सनलिटी स्पर्धेने गाजला.या स्पर्ध्येत सोमोजीत रॉय मिस्टर पर्सनॅलिटी तर मोनालिसा वर्मा मिस पर्सनॅलिटी ठरली.
वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवात सध्या वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळाडू आणि कलाकार आपले नशीब अजमावत आहे.काल रात्री चिमाजी आप्पा मैदानावर ग्रुप फॅशन शो भाणि मिस्टर व मिस पर्सनलिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रुप फॅशन शो स्पर्ध्येत
विजेता ठरला तर हा ग्रोप उपविजेता ठरला.स्पर्ध्येचे आकर्षण असलेल्या मिस्टर आणि मिस पर्सनॅलिटी स्पर्ध्येत सोमोजीत रॉय विजेता ठरला तर वलरॉथ कदम आणि शुभम दळवी द्वितीय आणि तृतीय ठरले.या स्पर्धेत मोनालिसा वर्मा हीने मिस पर्सनॅलिटीचा पुरस्कार पटकावला.तर सलोनी जैस्वाल आणि इशिका रॉड्रिक्स द्वितीय आणि तृतीय ठरल्या.स्पर्धेसाठी ऍड. विनायक पंडित आणि अलिशा डायस यांनी सुत्रसंचलन केले. स्पर्धेचा पारितोषिक समारंभ मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.या कार्यक्रमाला माजी आ.क्षितिज ठाकूर,
हास्यजत्रा कलाकार अरुण कदम,राहुल भोसले,चैताली जगनानी आणि पराग शहाणे उपस्थित होते.

