राजेंद्र क्षीरसागर,बीड
सरकारला उपरती,
बीडच्या मोर्चानंतर फडणवीस सरकार खडबडून जागे झाले, फरार आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी,
बीड येथे संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना अटक करावी,या मागणीसाठी आज बीड मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.यावेळी आ.सुरेश धस,आ.जितेंद्र आव्हाड,खा.बजरंग सोनावणे,आ.प्रकाश सोळखे,आ.संदीप क्षीरसागर,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील व छ.संभाजीराजे यांची भाषणे झाली.बीड जिल्ह्याच्या इतिहासात असा मोर्चा कधी निघाला नव्हता,असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी माध्यमांना सांगितले.या मोर्चानंतर फडणवीस सरकार खडबडून झाले व त्यांनी काही आदेश जारी केले आहेत.
आज बीड शहरात या मोर्च्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला होता.यावेळी सर्वच वक्त्यांनी वाल्मिक कराड व अन्य दोघांना सरकारने ताबडतोब अटक करावी,बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणावी,धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे,देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा,अशा मागण्या केल्या.
या मोर्चानंतर अवघ्या काही तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची मालमत्ता तसेच ज्या गुंडांनी हवेत गोळीबार केला,त्यांचे परवाने रद्द करा,असा निर्णय जाहीर केला.

