- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा, दुधाला अनुदान मिळालं ; शेतकऱ्यांचे घर आनंदात न्हालं ! सहकारी दूध संघ, खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर पाच रु.तर नंतरच्या कालावधीत सात रु.चे अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागातर्फे राबवण्यात येत आहे.या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ-उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ,खाजगी प्रकल्पांना गाईचे दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रु.अनुदान देण्याचा निर्णय ५ जाने.रोजी घेण्यात आला होता.त्यानंतर १ ऑक्टो.२०२४ पासून दोन रुपयांची वाढ करून आता सात रु.…
वसई कला क्रीडा महोत्सवाची स्मरणिका म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त ठेवा — अंबरीश मिश्र गेली ३५ वर्षे सुरु असलेला वसई तालुका कला – क्रीडा महोत्सव,हा राज्यातील एकमेव महोत्सव असावा.३५ व्या महोत्सवा निमित्ताने तयार केलेली स्मरणिका म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त असा दस्तऐवज आहे.हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे.असे उदगार जेष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी स्मरणीका प्रकाशन समारंभात काढले,. वसई तालुका कला क्रिडा महोत्सवात ३५ व्या वर्षानिमित्त ” दृष्टिक्षेप, ” या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र,यांच्या हस्ते आणि युवा नेते क्षितीज ठाकूर,डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे,प्रकाश वनमाळी, केवल वर्तक,यांच्या उपस्थितीत नरवीर चिमाजी आप्पा मैदानावरील रंगमंचावर करण्यात आले. मकरंद सावे,यांनी स्मरणिकेतील लेखांबद्दल…
दीपक मोहिते, क्रूरकर्मा अब्दुल रहमान नक्की,याचे पाकिस्तानात निधन, मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा व याकामी आर्थिक मदत करणारा लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की यांचे लाहोर येथे नुकतेच निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून हा नक्की अथरुणांवर खिळला होता.मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १७५ नागरिक मृत्युमुखी पडले तर ३०० जण गंभीर जखमी झाले होते.या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र समितीच्या सुरक्षा परिषदेने त्याला दहशतवादी घोषित केले होते.२०१९ मध्ये त्याला ३६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ” काश्मीर जर पाकिस्तानला न दिल्यास भारतात रक्ताच्या नद्या वाहतील,” अशी त्याने भारताला धमकी दिली होती.दहशतवादी निर्माण करण्यासाठी सुमारे ४ लाख…
संदीप जाधव,बोईसर, तारापूर येथे रासायनिक कंपनीला भीषण आग ; अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू, तारापूर एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला सायंकाळी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही कंपनी स्टार्लिंग हॉटेलसमोर,प्लॉट नंबर के – ६ येथे आहे.आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,आग लागल्यानंतर कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता,जो दूरवरूनही दिसत होता. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक टीम काम करत आहेत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळाभोवती बंदोबस्त वाढवला असून परिसराला घेराव घातला आहे.सुदैवाने,या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती…
वसंत भोईर,वाडा, जयवंत वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे मल्टीस्किल प्रशिक्षण संपन्न, जयवंत दादा वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आदिवासी ),वाडा येथे प्रशिक्षणार्थींकरिता सहा दिवसांचे मल्टी स्किल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. एशियन पेंट कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून संस्थेच्या ८० प्रशिक्षणार्थीना बेसिक पेंटिंग आणि प्लंबिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. २१ ते २६ ऑक्टो.२०२४ या कालावधीमध्ये पहिला टप्पा ४० प्रशिक्षणार्थी आणि २३ ते २८ डिसें.२०२४ या कालावधीत दुसऱ्या टप्पा ४० प्रशिक्षणार्थी,असे आयोजन होते.यामध्ये प्रशिक्षणार्थीना रंगकामाची प्राथमिक माहिती देण्यात आली.स्वच्छता करण्याकरताची साधने, अवजारे,त्यानंतर रंग देण्याकरिता वापरण्यात येणारी हत्यारे,अवजारे,ब्रश आणि रंगांचे विविध दर्जा नुसार करण्यात आलेले वर्गीकरण हे शिकवण्यात आले.प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून संस्थेतील…
सद्दाम शेख,मोखाडा, महिलेचा मृत्यू,हा व्यवस्थेने घेतलेला बळी- माजी आ. सुनील भुसारा, मोखाडा तालुक्यातील कोलध्याचा पाडा येथे आशा भुसारा या महिलेच्या प्रसूती नंतर मृत्यू झाला.तिला उपचारासाठी मोखाडा ते जव्हार आणि जव्हार हून नाशिक असा प्रवास करावा लागला.त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने हा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे तर आम्ही दोन दिवस अगोदर दाखल करूनही दिरंगाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. माजी आ.सुनील भुसारा यांनी या आज मयत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केले.तसेच नातेवाईकांडून या घटनेची माहिती घेतली,यावेळी त्यांनी महिलेचा झालेला मृत्यू हा व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचे सांगितले.या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक…
वसंत भोईर,वाडा, लाडक्या बहिणींना दिलासा,शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी ? राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे.हिवाळी अधिवेशनही नुकतेच पार पडले.लाडक्या बहिणींना खात्यात डिसें.चा हप्ता येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारने जाहीररित्या दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ?असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. महायुती सरकार राज्यात आल्यास २०१९ पासून ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे अशांची सरसकट कर्जमाफी करू,अशी घोषणा करण्यात आली होती.तसे घोषणापत्र सुद्धा भाजपतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.मात्र तसे झाले नाही, सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्यात २००२ पासून…
नवीन वर्षातही वाहनचालकांच्या नशिबी वाहतूककोंडीचं, मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या व्हाईट टॉपिंग प्रकल्पाचे काम अनियमित व नियोजनशून्य पद्धतीने, होत असल्यामुळे वाहनचालकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. एप्रिल २०२३ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२५ मध्येही पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत.परिणामी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील १२१ कि.मी.अंतराचे सिमेंट काँक्रिटीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे.बहुतांश काम पूर्ण झालेले असले तरी गुणवत्तेच्या अनेक समस्या आणि उर्वरित प्रलंबित कामामुळे महामार्गावर वारंवार ” वर्क प्रोग्रेस,”चे फलक झळकत आहेत.त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः वसई, नालासोपारा आणि बोईसर भागातील नागरिकांना या गैरसोयीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.…
दीपक मोहिते, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघाची बैठक संपन्न, महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघ मर्यादित,पुणे-स्थित,नागपूर येथे नुकतेच जंगल कामगार सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस बोईसरचे माजी आ.राजेश पाटील उपस्थित होते.या बैठकीत येत्या काळातbमहाराष्ट्र राज्यातील जंगल कामगार सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व संचालकांना मार्गदर्शन केले.यावेळी महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे अध्यक्ष वासुदेवराव टेकाम,संचालक राजीव मोघे,उखंडराव आगरे, घनश्याम मडावी,श्यामराव मडावी,ज्योतीराम तुमराम, देवरावजी तुमराम,वसंतराव सरोते,तुकाराम इरपाजी, धर्मराजज भलावी,राजेशज नैताम,दुर्गेश कळपती, संचालिका मायाताई मसराम, आशाताई पांडे,कार्यकारी संचालक राजेश कटरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राजू शिरसेकर,पालघर, आर्यन शिक्षण संस्थेच्या शाळेचे स्नेहसंमेलन पार पडले, आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या पालघर येथील मराठी प्राथमिक व पूर्व प्राथमिक या शाळेचे स्नेहसंमेलन काल पार पडला. विशेष म्हणजे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हस्तलिखित पुस्तक तयार केले होते.त्याचे प्रकाशन मोठ्या थाटामाटात पार पडले. या विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख व काढलेली चित्र खूपच छान आहेत. आर्यन एज्युकेशन सोसायटी ही १२७ वर्षे जुनी शिक्षण संस्था आहे. पालघर येथील प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेलाही तीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे.ही शाळा,इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्लिश माध्यमाची असून अभ्यासासोबत,खेळ व संगीत,नृत्य,कॉम्प्युटर,कराटे इ.विषय या शाळेत शिकवण्यात येते.त्यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते.त्याचबरोबर मराठी संस्कृती या शाळेतून शिकवली जाते.मराठी…
