वसई कला क्रीडा महोत्सवाची स्मरणिका म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी
उपयुक्त ठेवा — अंबरीश मिश्र
गेली ३५ वर्षे सुरु असलेला वसई तालुका कला – क्रीडा महोत्सव,हा राज्यातील एकमेव महोत्सव असावा.३५ व्या महोत्सवा निमित्ताने तयार केलेली स्मरणिका म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त असा दस्तऐवज आहे.हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे.असे उदगार जेष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी स्मरणीका प्रकाशन समारंभात काढले,.
वसई तालुका कला क्रिडा महोत्सवात ३५ व्या वर्षानिमित्त ” दृष्टिक्षेप, ” या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र,यांच्या हस्ते आणि युवा नेते क्षितीज ठाकूर,डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे,प्रकाश वनमाळी, केवल वर्तक,यांच्या उपस्थितीत नरवीर चिमाजी आप्पा मैदानावरील रंगमंचावर करण्यात आले.
मकरंद सावे,यांनी स्मरणिकेतील लेखांबद्दल प्रकाशझोत टाकताना यात, स्वर्गवासी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या स्मृतीस अभिवादन,३५ वर्षांच्या वाटचालीत आलेला अनुभव,कला क्रिडा महोत्सवातील खेळाडुंचे राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावरील यश, निस्वार्थी व विना मानधन काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा झालेला व्यक्तिमत्व विकास, महोत्सवाच्या तयारीची माहिती,मैदानाचे आराखडे व त्यांची मापे,सर्व स्पर्धांचे फॅार्म व नियमावली इ.माहिती दिली.डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे यांनी महोत्सवाच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल माजी आमदार हितेंद्र ठाकूर व सर्व कार्यकर्यांचे अभिनंदन केले. प्रकाश वनमाळी यांनी आभार मानले.

