वसंत भोईर,वाडा,
जयवंत वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे मल्टीस्किल प्रशिक्षण संपन्न,
जयवंत दादा वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आदिवासी ),वाडा येथे प्रशिक्षणार्थींकरिता सहा दिवसांचे मल्टी स्किल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. एशियन पेंट कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून संस्थेच्या ८० प्रशिक्षणार्थीना बेसिक पेंटिंग आणि प्लंबिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
२१ ते २६ ऑक्टो.२०२४ या कालावधीमध्ये पहिला टप्पा ४० प्रशिक्षणार्थी आणि २३ ते २८ डिसें.२०२४ या कालावधीत दुसऱ्या टप्पा ४० प्रशिक्षणार्थी,असे आयोजन होते.यामध्ये प्रशिक्षणार्थीना रंगकामाची प्राथमिक माहिती देण्यात आली.स्वच्छता करण्याकरताची साधने, अवजारे,त्यानंतर रंग देण्याकरिता वापरण्यात येणारी हत्यारे,अवजारे,ब्रश आणि रंगांचे विविध दर्जा नुसार करण्यात आलेले वर्गीकरण हे शिकवण्यात आले.प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांकडून एका वर्ग खोलीची रंगरंगोटी करण्यात आली.रंगकाम करत असताना आवश्यक असलेले पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट वापरून काम करून घेण्यात आले.यात महिला प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.एशियन पेंट अकॅडमीतर्फे आलेले विशाल कडव यांनी प्लम्बिंग विषय शिकवला,तर अक्षय पांडे आणि अभिनव पांडे यांनी पेंटिंगचे प्रशिक्षण दिले.
युवा परिवर्तनचे भाग्यवंत कोंडार यांनी या प्रशिक्षणाचे आयोजक – समन्वयक म्हणून काम केले.संस्थेतर्फे पंडित पाटील यांनी काम पाहिले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनामूल्य किट्सचे वाटप करण्यात आले.
आयटीआयच्या प्रशिक्षणारार्थीना एका शैक्षणिक वर्षात नियमित अभ्यासक्रमासोबतच २५० तासांचे अतिरिक्त प्रशिक्षण देणे गरजेचे असते.मल्टी स्किल प्रशिक्षणामुळे संस्थेतील इलेक्ट्रिशियन वेल्डर आणि स्विंग टेक्नॉलॉजी या व्यवसायातील ” प्रशिक्षणार्थ्यांना पेंटिंग आणि प्लंबिंग,” याचे बेसिक ज्ञान उपलब्ध करून देण्यात आले त्याचा नक्कीच या प्रशिक्षणार्थीना त्यांच्या पुढील आयुष्यात फायदा होईल. आयटीआय वाडा येथे अशाच प्रकारचे उत्तम प्रशिक्षण वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येते,” असे संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी सांगितले.

