संदीप जाधव,बोईसर,
तारापूर येथे रासायनिक कंपनीला भीषण आग ; अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू,
तारापूर एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला सायंकाळी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही कंपनी स्टार्लिंग हॉटेलसमोर,प्लॉट नंबर के – ६ येथे आहे.आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,आग लागल्यानंतर कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता,जो दूरवरूनही दिसत होता.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक टीम काम करत आहेत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळाभोवती बंदोबस्त वाढवला असून परिसराला घेराव घातला आहे.सुदैवाने,या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही.
आग कशामुळे लागली याविषयी संबंधित विभागाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान,ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असून कंपनीच्या परिसरात सतर्कता बाळगण्यात येत आहे.

