दीपक मोहिते,
क्रूरकर्मा अब्दुल रहमान नक्की,याचे पाकिस्तानात निधन,
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा व याकामी आर्थिक मदत करणारा लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की यांचे लाहोर येथे नुकतेच निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून हा नक्की अथरुणांवर खिळला होता.मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १७५ नागरिक मृत्युमुखी पडले तर ३०० जण गंभीर जखमी झाले होते.या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र समितीच्या सुरक्षा परिषदेने त्याला दहशतवादी घोषित केले होते.२०१९ मध्ये त्याला ३६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
” काश्मीर जर पाकिस्तानला न दिल्यास भारतात रक्ताच्या नद्या वाहतील,” अशी त्याने भारताला धमकी दिली होती.दहशतवादी निर्माण करण्यासाठी सुमारे ४ लाख डॉलर्सची आर्थिक निधी त्याने उभा केला होता.त्यामुळे त्याला पकडण्यासाठी संयुक्त राष्ट्र समितीच्या सुरक्षा परिषदेने दोन दशलक्ष डॉलर्स बक्षीस जाहीर केले होते.पण तो पाकिस्तानात खुले आम फिरत होता.अनेकदा तो लाहोर व इस्लामाबाद न्यायालयाच्या कामकाजात सहभागी झाला होता.मक्की हा हाफीझ सईदचा सावली म्हणून ओळखला जात असे.२०१९ मध्ये त्याला अटक झाली होती.पण त्यातून त्याची सुटका झाली.त्याच्यावर ४० हुन अधिक अधिक खटले दाखल आहेत.अशा या क्रूरकर्मा अशी ओळख असलेल्या नक्कीवर कठोर कारवाई करण्यासाठी जून २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत जेरबंद करण्याचा भारत व अमेरिकेच्या संयुक्त प्रस्तावाविरोधात चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करत तो प्रस्ताव रोखून धरला.आयुष्याच्या अखेरच्या टप्यात या मक्कीला अंथरुणावरून साधं उठणंही कठीण झालं होतं.अखेर दोन दिवसांपूर्वी या क्रूर दहशतवाद्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.त्याचा आजार इतका बळावला होता की, मृत्यूपूर्वी त्याचा मेंदुही काम करेनासा झाला होता.

