राजू शिरसेकर,पालघर,
आर्यन शिक्षण संस्थेच्या शाळेचे स्नेहसंमेलन पार पडले,
आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या पालघर येथील मराठी प्राथमिक व पूर्व प्राथमिक या शाळेचे स्नेहसंमेलन काल पार पडला.
विशेष म्हणजे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हस्तलिखित पुस्तक तयार केले होते.त्याचे प्रकाशन मोठ्या थाटामाटात पार पडले. या विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख व काढलेली चित्र खूपच छान आहेत.
आर्यन एज्युकेशन सोसायटी ही १२७ वर्षे जुनी शिक्षण संस्था आहे. पालघर येथील प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेलाही तीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे.ही शाळा,इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्लिश माध्यमाची असून अभ्यासासोबत,खेळ व संगीत,नृत्य,कॉम्प्युटर,कराटे इ.विषय या शाळेत शिकवण्यात येते.त्यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते.त्याचबरोबर मराठी संस्कृती या शाळेतून शिकवली जाते.मराठी माध्यमातून शिकूनही समाजात कुठेही मुलं कमी पडत नाहीत,डॉक्टर, इंजिनियर्स,शास्त्रज्ञ,शिक्षक कलाकार,खेळाडू व अनेक मोठे अधिकारी या शिक्षण संस्थेमधून शिकून विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.

